शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सीटूची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:40 AM2020-12-04T04:40:53+5:302020-12-04T04:40:53+5:30
नाशिक : केंद्र सरकारने मंजूर केलली तीनही कृषी सुधारण विधेयके शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत सेंटर ऑफ इंडियन ...
नाशिक : केंद्र सरकारने मंजूर केलली तीनही कृषी सुधारण विधेयके शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू)तर्फे आयभवनसमोर निदर्शने करून शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनास समर्थन देत केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. त्याचप्रमाणे शेतकरी व कामगारच्या विविध मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतीमालाला कवडीमोड भाव देण्याची नीती सरकार आखत असून, शेतकऱ्यांची जमीन कॉर्पोरेटच्या घश्यात घालण्याचा भाजप सरकारचा अट्टाहास असल्याचा आरोप करीत सीटूतर्फे केंद्र सरकार विरोधात गुरुवारी निदर्शने करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी सुधारणा विधेयकांच्या माध्यमातून बाजार समित्यांच्या बाहेर कंपन्यामार्फत बड्या कंपन्यांना घाऊक खरेदीचे अधिकार मिळणार आहेत. त्यातून बाजार समित्यांची व्यवस्था आणि शासनाकडून हमीभावाला होणारी धान्याची घाऊक खरेदी बंद होणार असल्याचे नमूद करीत सीटूतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर करून केंद्र सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप करतानाच या दडपशाहीचाही सीटूतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल कराड, सीताराम ठोंबरे, देवीदास आडोळे, वसुदा कराड, कल्पना शिंदे, सिंधू शार्दूल, संतोष काकडे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार आहे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.