सरकारविरोधात सीटूचा आक्रोश मेळावा
By admin | Published: April 12, 2017 10:58 PM2017-04-12T22:58:32+5:302017-04-12T22:58:49+5:30
सरकारविरोधातसीटूचा आक्रोश मेळावा
सातपूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आयोजित आक्रोश मेळाव्यात विविध मागण्यांचे ठराव पारित करीत शासनाने कामगारांचे प्रश्न त्वरित सोडविण्याची मागणी सीटू युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.
मनेसर हरियाणा येथील मारुती उद्योगातील १३ कामगारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याच्या विरोधात सीटू भवन येथे कामगारांचा आक्र ोश मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्रीधर देशपांडे होते. राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आक्रोश म्हणजे रडणे नव्हे, तर शासकीय यंत्रणेच्या विरोधात आवाज उठविणे होय. कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सीटूचा लढा कायम राहणार आहे.
यावेळी डॉ. कराड यांनी कामगारांच्या विविध मागण्यांचा ठराव मांडला. हा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. लवकरच हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या मेळाव्यास राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या सुनंदा जरांडे, कामगार विकास मंचचे प्रवीण पाटील, मुंबई श्रमिक संघाचे भिवाजी भावले, सिमेन्स कंपनीचे अशोक घुले, सीताराम ठोंबरे, आर. एस. पांडे, देवीदास आडोळे, कल्पना शिंदे, संतोष काकडे, तुकाराम सोनजे, सिंधू शार्दुल, भूषण सातळे आदिंसह विविध संघटनांचे कामगार नेते उपस्थित होते. (वार्ताहर)