रेल्वेच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ सीटूतर्फे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 07:57 PM2020-07-17T19:57:37+5:302020-07-18T00:50:51+5:30
इगतपुरी : रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात इगतपुरीत सीटूच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत स्थानकासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने १०९ रेल्वे मार्गावर १५१ खासगी रेल्वे गाड्या चालविण्यासाठी देशी-विदेशी खासगी कंपन्यांना निमंत्रित केले आहे.
इगतपुरी : रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात इगतपुरीत सीटूच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत स्थानकासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने १०९ रेल्वे मार्गावर १५१ खासगी रेल्वे गाड्या चालविण्यासाठी देशी-विदेशी खासगी कंपन्यांना निमंत्रित केले आहे. यापूर्वी सरकारने रेल्वे इंजिन व बोगिचे उत्पादन, इलेक्ट्रिकल आणि सिग्नलचे काम व मालवाहतूक मार्ग यामध्ये १०० टक्के परकीय गुंतवणुकीला मुभा दिली आहे. सरकार ४०० रेल्वे स्टेशनचे खासगीकरण करणार आहे. रेल्वेचे खासगीकरण रद्द करा, क व ड वर्गातील पदे रिक्त करण्याचा निर्णय मागे घ्या,१ लाख २५ हजार रिक्त पदे तातडीने भरा आदींसह विविध मागण्यांचे निवेदन इगतपुरीचे स्टेशन प्रबंधक यांना देण्यात आले. सीटूचे नाशिक जिल्हा सरचिटणीस कॉ. देविदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी कॉ. कांतीलाल गरु ड, कॉ. निवृत्ती कडू, कॉ. चंद्रकांत लाखे, कॉ. मच्छिंद्र गतीर, कॉ. दत्ता राक्षे, कॉ. विश्वास दुभाषे, कॉ. प्रभाकर नाठे आदी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
----------------------
मनमाडला निदर्शने
मनमाड : सरकारने भारतीय रेल्वे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून देशातील रेल्वेगाड्या खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी देश-विदेशातील कंपन्यांना
निमंत्रित केले आहे. याविरोधात मनमाड येथे विविध कामगार संघटनाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकार भारतीय रेल्वे विकण्याचा घाट घालत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसह सामान्य जनतेलाही याचा मोठा फटका बसणार आहे. या विरोधात सिटू संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू केले आहे.
मनमाड शहरातही नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या सदस्यांनीही पाठिंबा देत सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला. यावेळी युनियनचे कॉ. अंबादास निकम, सबरीश नायर, हेमंत डोंगरे, सुनील गडवे, किरण कातकडे, मिलिंद लिहणार, प्रवीण बागुल, रमेश केदारे, सुरेश पगारे, सचिन काकड, नवनाथ आव्हाड तर सिटू संघटनेचे रामदास पगारे, तुकाराम सोनजे, जॉर्ज जॉनी, किशोर आहिरे आदी उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाला आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले.