इगतपुरी तहसीलवर सीटूची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 10:04 PM2020-07-03T22:04:31+5:302020-07-04T00:32:13+5:30
कामगारांचे वेतन, वाढीव वीजबिले, मोफत धान्य वाटप, कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना कामावर घेणे आदी विविध मागण्यांसाठी सीटूचे जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. ३) निदर्शने करण्यात आली.
नांदूरवैद्य : कामगारांचे वेतन, वाढीव वीजबिले, मोफत धान्य वाटप, कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना कामावर घेणे आदी विविध मागण्यांसाठी सीटूचे जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. ३) निदर्शने करण्यात आली. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले. गरिबांना स्वस्त धान्य दुकानांतून धान्य लाभ मिळावा, सार्वजनिक उद्योग क्षेत्राचे खासगीकरण व विक्र ीचे निर्णय मागे घेण्यात यावे. आयकर लागू नसलेल्या नागरिकांना दरमहा १० हजार रु पये प्रमाणे सहा महिने आर्थिक साहाय्य करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनात चंद्रकांत लाखे, दत्ता राक्षे, कांतीलाल गरु ड, निवृत्ती कडू, मच्छिंद्र गतीर, हेमंत तोकडे, आप्पासाहेब भोले, छगन राक्षे, सोमनाथ राक्षे आदींसह सहभागी झाले होते.