सिटूतर्फे भाववाढ, बेरोजगारीची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:10 AM2021-03-30T04:10:36+5:302021-03-30T04:10:36+5:30
कामगार कायदे व कृषी कायदे मागे घ्या, याचबरोबर वीजबिल विधेयक मागे घ्या, यासह विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या आणि ...
कामगार कायदे व कृषी कायदे मागे घ्या, याचबरोबर वीजबिल विधेयक मागे घ्या, यासह विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या आणि केंद्र सरकारने घेतलेल्या कामगार कायदे व कृषी कायद्यांचा निषेध करण्यात आला. १ एप्रिल, २०२१ पासून कामगार कायदे लागू होणार असल्याने कामगारांना आता मोठा संघर्ष करावा लागेल. त्यामुळे आता सर्वांनी आपली एकजूट व ताकद दाखवून हे कायदे लागू होणार नाही, यासाठी काम करण्याची गरज असल्याची माहिती सिटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी रिक्षा युनियनचे पदाधिकारी बाळासाहेब कदम, सिटूचे निवृत्ती केदार, संजय पवार, नितिन पाटील, भाऊसाहेब टिळे, जे.पी.यादव, फुलचंद सिंग, इन्द्रसन यादव, अमरजीत सिंग, सुनील विश्वकर्मा, प्रशांत वाकचौरे, बळीराम चव्हाण, भागवत फसाळे, दीपक सदावर्ते, बाळू दिवटे यासह अनेक कामगार कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संतोष काकडे यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली.
(फोटो २९ सीटू) सिटू कार्यालयासमोर भाववाढ, बेरोजगारीची होळी पेटवून निषेध व्यक्त करताना सीताराम ठोंबरे, संतोष काकडे, बाळासाहेब कदम, निवृत्ती केदार, संजय पवार, नितीन पाटील आदी.