मालेगावातील गोळीबार प्रकरणातील सहा आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 11:52 PM2021-07-13T23:52:33+5:302021-07-14T00:45:13+5:30

मालेगाव मध्य : गेल्या ८जुलै रोजीकल्याणला शेळ्या विकण्यासाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे व्यापारी अलीम सलीम खाटीक यांच्या पिकअपवर गोळीबार करणाऱ्या ६ जणांना पोलिसानी ताब्यात घेतले असून त्यांचे विरोधात पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Six accused in Malegaon shooting case arrested | मालेगावातील गोळीबार प्रकरणातील सहा आरोपी ताब्यात

मालेगावातील गोळीबार प्रकरणातील सहा आरोपी ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देपवारवाड़ी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मालेगाव मध्य : गेल्या ८जुलै रोजीकल्याणला शेळ्या विकण्यासाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे व्यापारी अलीम सलीम खाटीक यांच्या पिकअपवर गोळीबार करणाऱ्या ६ जणांना पोलिसानी ताब्यात घेतले असून त्यांचे विरोधात पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापारी अलीम खाटीक हे आपल्या नातेवाईकांसह त्यांचेकडील पिकअप वाहन क्र.. एम. एच. ४८. ए. जी. ८७६१ या वाहनात बकरीईद निमित्ताने कल्याण येथे बकरे विक्री करण्यासाठी घेऊन जात असतांना, पहाटेचे सुमारास तालुक्यातील पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर दरेगाव शिवारात, जनता सायजिंग जवळ मोटर सायकलवर आलेल्या अज्ञात तीन इसमांनी पिकअप गाडी यांबविण्यास सांगितले.

पिकअप गाडीवरील चालक नितेश निकम व अलीम खाटीक यांना संशय आल्याने त्यांनी गाड़ी यांबविली नाही म्हणुन मोटर सायकलवरील तीन इसमांपैकी मध्ये बसलेल्या इसमाने चालु गाडीवर बंदुकीतुन गोळी झाडली. गोळी पिकअपच्या केबीनमध्ये बसलेल्या जावेद रज्जाक खाटीक यांचे डोक्याचे डावे बाजुस लागुन से गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. घटनेबाबत फिर्यादी अलीम सलीम खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवारवाड़ी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेतील जखमी झालेले जावेद रज्जाक खाटीक हे उपचारादरम्यान मयत झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेबाबत पोलीस अधीक्षक श सचिन पाटील यांनी तात्काळ दखल घेवुन सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी मालेगाव सह नजीकचे जिल्हयात तपास पथके रवाना केली. तसेच सदर गुन्हयातील आरोपीचे गुन्हा करण्याचे पध्दतीवरुन गुप्त माहिती घेवुन संशयीत हासिम पिंजारी उर्फ पापा गोल्डन, रा. दरेगाव शिवार, मालेगाव, गोपाल गिरासे, रा. साकीरोड, धुळे, सैय्यद अबुजर, रा. नयापुरा, मालेगाव मकसुद अहमद उर्फ मत्से, रा. रहेमानपुरा, मालेगाव, मोहमद साजिद उर्फ मिर्ची, रा. रजापुरा, मालेगाव, मोहमद अकम उर्फ मंथन चोरवा, रा. गोल्डननगर, मालेगाव यांना ताब्यात घेण्यात आले. "त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपींनी गुन्हयात वापरलेली मोटर सायकल मिळुन आली. गुन्हयात वापरलेले अग्निशस्त्रावे (बंदुक) तुकडे करून नदीत फेकले असल्याचे कबुल केले. त्या ठिकाणावरून अग्निशस्त्र (बंदुक) चे तुकडे जप्त करण्यात आले आहे. यातील आरोपीना वरील गुन्हयात अटक करण्यात आली. पुढील तपास पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत भोये यांचे पथक करीत आहे.

पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत भोये, हवालदार सचिन धारणकर, पोना भरत गांगुर्डे, विनायक जगताप, पोलीस कर्मचारी नवनाथ शेलार, सचिन भामरे, अंबादास डामसे, राकेश जाधव यांचे पथकाने गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेवुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

Web Title: Six accused in Malegaon shooting case arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.