जुने नाशिकमधील सहा सराईत तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:35 AM2019-07-06T00:35:45+5:302019-07-06T00:37:02+5:30
शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी परिमंडळ-१ व २मधील विविध पोलीस ठाण्यांत शरीराविरुद्धचे जबरी गुन्हे करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारांची चौकशी करून त्यांना जिल्ह्याबाहेर तडीपार करण्याची कारवाई उपआयुक्तांनी सुरू केली आहे.
नाशिक : शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी परिमंडळ-१ व २मधील विविध पोलीस ठाण्यांत शरीराविरुद्धचे जबरी गुन्हे करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारांची चौकशी करून त्यांना जिल्ह्याबाहेर तडीपार करण्याची कारवाई उपआयुक्तांनी सुरू केली आहे. दोन दिवसांत लागोपाठ उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी १३ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. यामध्ये दोघा पोलीसपुत्रांचाही समावेश आहे. गुरुवारी (दि.४) जुुन्या नाशकातील सहा संशयित गुन्हेगारांना वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील वाढती गुंडगिरी व टोळक्यांची दहशतीचा बीमोड करण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सराईत गुन्हेगारांची चौकशी करून तत्काळ त्यांना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपआयुक्त अमोल तांबे, पाटील यांनी विविध पोलीस ठाण्यांमधील सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरू केली असून, ज्यांची चौकशी पूर्ण झाली त्यांचे प्रस्ताव नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवून सराईत गुंडांना तडीपार करण्याची कारवाई हाती घेतली आहे.
प्रस्तावांची चौकशी सुरू
जुने नाशिक परिसरातील चर्मकार लेनमध्ये राहणाºया धनंजय महेश गायकवाड याच्या टोळीमधील सहा गुंडांना वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये अक्षय धनंजय कानडे (२२), रविराज भगीरथ वाघ (३२), गौरव बाबू वाकोडे (१९), प्रतीक सुरेश काशिद (१८), पिंटू ऊर्फ यादव धनंजय कानडे (४२, सर्व रा. काजीपुरा) यांचा समावेश आहे. अद्याप परिमंडळ १मधून एकूण १३१ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. १० गुंडांची तडीपार प्रस्तावांची चौकशी सुरू असून, लवकरच त्यावर निर्णय होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.