दळवटला बिबट्याकडून सहा शेळ्यांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 06:31 PM2019-05-17T18:31:37+5:302019-05-17T18:32:24+5:30

दोन जखमी : परिसरात पिंजरा लावण्याची मागणी

A six-goat fiddha from a leopard | दळवटला बिबट्याकडून सहा शेळ्यांचा फडशा

दळवटला बिबट्याकडून सहा शेळ्यांचा फडशा

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ काटे व डॉ पवार यांनी पंचनामा केला असून जखमी शेळ्यांवर उपचार केले

कळवण : तालुक्यातील दळवट परिसरात वन्यप्राण्यांनी धुमाकुळ घातला असून बिबट्यासारखे हिंस्र प्राणी सर्रास आढळून येत आहेत. गुरुवारी (दि.१६) दळवट येथील सीताराम पवार यांच्या मळ्यातील ५ शेळ्यांचा बिबटयाने गळा घोटला तर २ शेळ्या जखमी झाल्या आहेत. बिबट्या १ शेळी बरोबर घेऊन गेला असल्याचे शेळी मालक सीताराम पवार यांनी सांगितले.
गुरु वारी दिवसभर सीताराम पवार यांनी परिसरात शेळ्या फिरविल्यानंतर रात्रीच्यावेळी आपल्या मळ्यात त्या बंदीस्त केल्या. पहाटे बिबट्याने या शेळ्यांचा नरडीचा घोट घेतला. या हल्ल्याने या शेळी मालकाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन भेट देवून पंचनामा केला. जिल्हा परिषदचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ काटे व डॉ पवार यांनी पंचनामा केला असून जखमी शेळ्यांवर उपचार केले. बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढविण्याच्या घटनेमुळे दळवट परिसरात मळ्याच्या ठिकाणी राहणारे नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून या परिसरात वन्यप्राण्याचा वावर असून बिबटयाने धुमाकूळ घातल्याची घटना ताजी आहे. वनविभागाने तत्काळ धाव घेऊन परिसरातील आदिवासी बांधवांना दिलासा दिला मात्र परिसरात बिबट्याचा वावर असल्याने पिंजरा लावावा, अशी मागणी संयुक्त वनसमितीसह बाजार समितीचे संचालक रमेश पवार, माजी सरपंच यशवंत पवार यांनी केली आहे.

परिसरात दहशतीचे वातावरण
शेळी फस्त केल्याच्या घटनेमुळे दळवट परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील पाड्या वाड्यावर बिबट्याचा वावर असून बकरी व शेळ्या यांचा फडशा पडल्याची घटना घडल्या आहे. या भागातील आदीवासी बांधव भीतीच्या छायेखाली असून वनविभागाने परिसरात पिंजरा लावून आदीवासी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी वनविभागाकडे केली आहे.

Web Title: A six-goat fiddha from a leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक