खासगी बसचे सहाशे तर टॅक्सीचे आठशे रुपये भाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:03 AM2017-08-30T01:03:52+5:302017-08-30T01:03:58+5:30
दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे मुंबईला रेल्वे मार्गाने जाऊ न शकणाºया हजारो प्रवाशांनी खासगी बस आणि टॅक्सींचा आधार घेतला. परंतु खासगी बसचालकांनी नियमित भाडे वाढवून चक्क पाचशे ते सहाशे आणि टॅक्सीचालकांनी तब्बल आठशे ते नऊशे रुपयांचे भाडे वसूल करीत प्रवाशांची अक्षरश: लूट केली. रात्री कल्याण येथे खासगी बस अडविल्यानंतर बस पाठविणे बंद करण्यात आले आहे.
नाशिक : दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे मुंबईला रेल्वे मार्गाने जाऊ न शकणाºया हजारो प्रवाशांनी खासगी बस आणि टॅक्सींचा आधार घेतला. परंतु खासगी बसचालकांनी नियमित भाडे वाढवून चक्क पाचशे ते सहाशे आणि टॅक्सीचालकांनी तब्बल आठशे ते नऊशे रुपयांचे भाडे वसूल करीत प्रवाशांची अक्षरश: लूट केली. रात्री कल्याण येथे खासगी बस अडविल्यानंतर बस पाठविणे बंद करण्यात आले आहे. दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे पंचवटीसह अन्य सर्व रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांना पुन्हा नाशिकरोडहून नाशिक शहर गाठावे लागले. त्यामुळे महामार्ग बसस्थानकावर गर्दी झाली होती. राज्य परिवहन मंडळाने ज्यादा बसची सोय केली असली तरी त्याला मर्यादा असल्याने हजारोंच्या संख्येने जमलेल्या प्रवाशांनी खासगी बस वाहतुकीची मदत घेतली. मात्र ही संधी साधून खासगी बस व्यावसायिकांनी दरवाढ करून अक्षरश: लूट केली. बसचे प्रवासीभाडे वाढवून ते पाचशे ते सहाशे रुपये प्रतिप्रवासी असे वसूल केले. प्रवाशांची संख्या बघून दरवाढ होत होती. हाच प्रकार टॅक्सी आणि कुलकॅबच्या बाबतीतही घडला. मुंबई सेवा देणाºया टॅक्सीचालकांनी आठशे ते नऊशे रुपये प्रतिप्रवासी असे दर आकारले. इतके ज्यादा दर मोजूनही प्रवासी मुंबईकडे रवाना होत होते. ज्यांना हे दर शक्य नव्हते त्यांनी मुंबईकडे जाणाºया टेम्पो, ट्रक्सचा देखील आधार घेतला.
मुंबईकरांना हॉटेल, ढाब्यांचा सहारा
व्यवसाय वा कामानिमित्त कारने मुंबईबाहेर गेलेले व पुन्हा घरी परतणाºया मुंबईकरांची वाहने सायंकाळी सहा वाजेपासूनच महामार्ग पोलिसांनी घोटी टोल नाक्यावर रोखली़
रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने व त्यातच मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांनी हा निर्णय घेतला होता़
या कालावधीत प्रवाशांची तसेच वाहनचालकांना राहण्यासाठी महामार्गावरील मंदिरे व चर्चमध्ये व्यवस्था करण्यात आली होती़
काहींनी ढाबे तसेच हॉटेल्सचा पर्याय निवडला़
सकाळपासून रस्त्याच अडकलेल्या प्रवाशांचे मोबाईलही डिस्चार्ज झाल्याने संपर्कात अडचणी येत होत्या.