कार पलटल्याने सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 05:54 PM2018-12-05T17:54:57+5:302018-12-05T17:55:14+5:30

वणी : सापुतारा कडुन वणी बाजुस येणार्या ईको कारवरील चालकाचे नियंत्रित सुटल्याने सहा लोक जखमी झाले असुन याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Six injured in car collapse | कार पलटल्याने सहा जखमी

कार पलटल्याने सहा जखमी

Next
ठळक मुद्देगव्हाला पाणी भरताना मारहाण एकावर गुन्हा

वणी : सापुतारा कडुन वणी बाजुस येणार्या ईको कारवरील चालकाचे नियंत्रित सुटल्याने सहा लोक जखमी झाले असुन याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची माहीती अशी की जीजे 15ई एफ2165 ही कार नमुद मार्गावरु न मार्गक्र मण करत असताना करंजखेड शिवारात उताराचे रस्त्यावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले त्यात झालेल्या अपघातात कमलेश भिकु गावित शितल भोये अरु णा विजय पटेल पार्वता बेन शंकर भोये आर्यन विजय पटेल विजय जसवंत पटेल हे जखमी झाले आहेत.
गव्हाला पाणी भरताना मारहाण एकावर गुन्हा
वणी : दिंडोरी तालुक्यातील घोडेवाडी शिवारात शेतात शेतात पाणी गेल्याच्या वादातुन दगड व विळ्याने मारहाण केल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण अनाजी घोडे हा युवक स्वत:च्या शेतातील गव्हास पाणी भरत असताना शेजारील दिपक किसन जाधव यांचे शेत जमीनीत हे पाणी गेल्याने झालेल्या वादातुन दिपक जाधव यांनी किरण घोडे याला दगड व विळ्याने मारहाण केल्याची फिर्याद छाया अनाजी घोडे यांनी दिल्याने जाधव यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधावर दुचाकी धुण्यावरु न वाद
पाच लोकांविरोधात गुन्हा
वणी : दिंडोरी तालूक्यातील जऊळके शिवारातील शेतजमीनीच्या बांधावर दुचाकी धुणार्या युवकाला पाच लोकांनी शेतात पाणी गेल्याच्या वादातुन मारहाण केल्याने दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिक दिपक दवंगे हा युवक हा स्वत:च्या शेताच्या बांधावर दुचाकी धुत असताना ते पाणी संशयीतांच्या शेतजमिनीत गेल्याने प्रतिक याला बांबु दगड व फायटरने मारहाण करु न विहिर बुजविण्याची धमकी दिल्याची फिर्याद प्रतिकने दिल्याने संपत लक्ष्मण दवंगे, अतुल दवंगे, यमुनाबाई दवंगे, महेन्द्र दवंगे, लक्ष्मण दवंगे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Six injured in car collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.