शेतजमीन व्यवहारातून सहा लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:35 AM2017-10-09T00:35:57+5:302017-10-09T00:39:59+5:30

नाशिक : बेळगाव ढगा शिवारातील एक एकर शेतजमिनीचा व्यवहार करून त्यापोटी सहा लाख रुपये घेतल्यानंतर जमिनीची खरेदी न देता फसवणूक केल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Six lakh cheating against farm trade | शेतजमीन व्यवहारातून सहा लाखांची फसवणूक

शेतजमीन व्यवहारातून सहा लाखांची फसवणूक

Next


नाशिक : बेळगाव ढगा शिवारातील एक एकर शेतजमिनीचा व्यवहार करून त्यापोटी सहा लाख रुपये घेतल्यानंतर जमिनीची खरेदी न देता फसवणूक केल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ नीता देठे (गंगापूररोड) यांच्यासोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन संशयित नेहा कुलकर्णी (रा़ कृषिनगर) यांनी बेळगाव ढगा शिवारातील एक एकर शेतजमिनीचे १२ मे २०१४ रोजी साठेखत केले़ त्यापोटी सहा लाख आरटीजीएसद्वारे घेतले़ मात्र वेळोवेळी पाठपुरावा करूनही या जमिनीची खरेदी करून न देता फसवणूक केली.

Web Title: Six lakh cheating against farm trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.