महसूलच्या कारवाईत सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 12:08 AM2020-08-22T00:08:29+5:302020-08-22T01:09:38+5:30
मालेगाव : महसूल विभागाने शहर पोलिसांच्या मदतीने नवरंग सायझिंगजवळ छापा टाकून ३ लाख १६ हजार ८०० रुपये किमतीच्या बायोडिझेलसह ६ लाख ६६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. महसूल व पोलीस विभागाने सायंकाळी ही कारवाई केली.
मालेगाव : महसूल विभागाने शहर पोलिसांच्या मदतीने नवरंग सायझिंगजवळ छापा टाकून ३ लाख १६ हजार ८०० रुपये किमतीच्या बायोडिझेलसह ६ लाख ६६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. महसूल व पोलीस विभागाने सायंकाळी ही कारवाई केली.
जाफरनगर भागात एम. बी. सायझिंगच्या बाजूला अहेले हदिस मशिदीजवळ मोहंमद असद हाफीज अकील अहमद हे त्याच्या मालकीच्या गोडावूनमध्ये बायोडिझेलच्या नावाखाली कंपनी जनरेटर बायोडिझल म्हणून विक्री करीत असल्याची मिळाली. नायब तहसीलदार पवार यांच्यासोबत सदर ठिकाणी कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले. त्यानुसार ताज हॉटेलजवळून जाफरनगरकडे जाताना वाहने उभी केली. सदर ठिकाणी एम. बी. सायझिंगच्या बाजूला गोडावूनच्या शटरजवळ उभ्या असलेल्या ट्रकच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाच्या टाकीमधून नळी टाकून विविध ड्रममध्ये बायोडिझेल भरताना मिळून आले. नायब तहसीलदार पवार यांनी विचारणा केली असता मोहंमद असद हाफीज अकील अहमद रा. सरदारनगर याने समाधानकारक माहिती न दिल्याने पवार यांनी गोडावून व ट्रकची पाहणी केली.
विविध रंगाच्या ड्रममध्ये बायोडिझेल मिळून आले. यात ३ हजार ८१६ रूपये किंमतीचे ५ हजार ७६० लिटर बायोडिझेल किंमत प्रत्येकी ५५ रूपये लिटर प्रमाणे ८०० लिटरचे ९ ड्रम गोडावूनमध्ये मिळून आले. १० लिटरच्या एकूण ९६ कॅन बायोडिझेलने भरलेल्या मिळाल्या. पंचांसमक्ष पवारवाडी पोलीस ठाण्यात ट्रक आणण्यात आला. रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्याचे काम सुरू होते.