शेतीविरोधी कायदे मागे घेण्यासाठी सहा लाख सह्यांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:24 AM2021-03-04T04:24:55+5:302021-03-04T04:24:55+5:30

येवला : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि शेतीविरोधी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने देशभरात १० लाख सह्या ...

Six lakh signature drive to repeal anti-agriculture laws | शेतीविरोधी कायदे मागे घेण्यासाठी सहा लाख सह्यांची मोहीम

शेतीविरोधी कायदे मागे घेण्यासाठी सहा लाख सह्यांची मोहीम

Next

येवला : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि शेतीविरोधी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने देशभरात १० लाख सह्या गोळा करण्यात आल्या. महाराष्ट्रात सहा लाख सह्या गोळा करण्यात आल्या. त्यांचे एक संयुक्त निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शेतकरी नेते राजू शेट्टी, प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.

आमदार कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, नितिन मते, राजा कांदळकर, अबिद शेख, चंद्रकांत म्हात्रे, सचिन बनसोडे, रोहित ढाले यांचा शिष्टमंडळात समावेश होता. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्राभर एकूण ६ लाख ७५ हजारांहून अधिक सह्या असलेली निवेदने स्थानिक तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना सेवा दल पदाधिकारी आणि समविचारी कार्यकर्त्यांनी दिले.

-------------------------

केंद्र सरकारने संसदेत पारित केलेले तीनही शेतीविषयक कायदे शेतकरीविरोधी असून, त्यातून देशातील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. या कायद्यांच्या विरोधात तीन महिन्यांपासून राजधानी दिल्लीच्या सरहद्दीवर शेतकर्‍यांचे अभूतपूर्व अहिंसक आंदोलन सुरू आहे. त्याची दखल घेण्याऐवजी हे आंदोलन निर्दयपणे दडपण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आणि शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेतीविरोधी तीनही कायदे ताबडतोब मागे घेण्याची मागणी करण्यासाठी ही सहयांची मोहीम घेण्यात आल्याची माहिती राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांनी दिली आहे. (०१ येवला राज्यपाल)

===Photopath===

020321\02nsk_1_02032021_13.jpg

===Caption===

०१ येवला राज्यपाल

Web Title: Six lakh signature drive to repeal anti-agriculture laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.