घरफोडीतील सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By admin | Published: May 12, 2017 01:44 AM2017-05-12T01:44:22+5:302017-05-12T01:44:33+5:30
नाशिक : विसे मळा परिसरातील साखला बंगल्यात झालेल्या घरफोडीत सुमारे सहा लाख ७७ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विसे मळा परिसरातील साखला बंगल्यात झालेल्या घरफोडीत सुमारे सहा लाख ७७ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेला यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल रोजी विसे मळा येथील रहिवासी प्रशांत कांतीलाल साखला यांच्या घरात घरफोडी झाली होती. या घरफोडीत परदेशी कंपन्यांची महागडी मनगटी घड्याळे, सोन्या-चांदीची नाणी, मोबाइल असा एकूण सहा लाख ७७ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी साखला यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाकडे सोपविला होता. यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. सहायक पोलीस निरीक्षक एस. के. तांदुळवाडकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, राजेंद्र जाधव, रमेश घडवजे, ललिता अहेर, राहुल सोळसे आदिंनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून सोमवारी (दि.८) डॉ. हेडगेवारनगरच्या जॉगिंग ट्रॅकजवळ सापळा रचला.
यावेळी संशयित इसम सिद्धार्थ हरिकिशोर सिंग (रा. होलाराम कॉलनी) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता सिंग हा साखला यांच्याकडे सुपरवायझर म्हणून नोकरीला असल्याचे समोर आले.