विदेशी मद्यासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 10:23 PM2017-08-04T22:23:47+5:302017-08-05T00:22:46+5:30
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या हॉटेलांना अंतराची मर्यादा घालून दिल्यानंतरही घोटी -सिन्नर रस्त्यावरील एका हॉटेलात सर्रासपणे बेकायदा दारूविक्री होत असल्याची माहिती समजताच विशेष पथकाने गुरुवारी रात्री घोटी - सिन्नर रस्त्यावरील पिंपळगाव मोर शिवारात एका हॉटेलवर छापा टाकत विदेशी दारूचा साठा जप्त केला.
घोटी : सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या हॉटेलांना अंतराची मर्यादा घालून दिल्यानंतरही घोटी -सिन्नर रस्त्यावरील एका हॉटेलात सर्रासपणे बेकायदा दारूविक्री होत असल्याची माहिती समजताच विशेष पथकाने गुरुवारी रात्री घोटी - सिन्नर रस्त्यावरील पिंपळगाव मोर शिवारात एका हॉटेलवर छापा टाकत विदेशी दारूचा साठा जप्त केला.
घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाºया घोटी - सिन्नर रस्त्यावरील हॉटेलात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून सर्रासपणे दारूविक्र ी होत असतानाही या बाबीची कल्पना घोटी पोलिसांना असूनही कारवाई होत नसल्याने अखेर आज याबाबत जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे यांनी लक्ष घातले. त्यांच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्रीच्या सुमारास घोटी-सिन्नर रस्त्यावरील हॉटेलवर छापा टाकला. या पथकाने केलेल्या कारवाईत हॉटेलमध्ये विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेला दहा हजार रुपयाचा दारूसाठा जप्त केला. याबाबत बबन यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हे पथक ही कारवाई करून घोटीकडे परतत असताना वाहनाचा संशय आल्याने त्यांनी वाहनाची तपासणी केली.