गिरणारेजवळ सहा लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:15 AM2018-11-15T00:15:27+5:302018-11-15T00:15:58+5:30

महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या मद्याची हरसूलमार्गे चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघा परप्रांतिय संशयितांकडून राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने दोन लाखांचा मद्यसाठा व कार असा एकूण पावणेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे़

Six liquor bottles seized near Girnar | गिरणारेजवळ सहा लाखांचा मद्यसाठा जप्त

गिरणारेजवळ सहा लाखांचा मद्यसाठा जप्त

Next

नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या मद्याची हरसूलमार्गे चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघा परप्रांतिय संशयितांकडून राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने दोन लाखांचा मद्यसाठा व कार असा एकूण पावणेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे़ अब्दुल कादर अब्दुल हमीद  शेख व रिझवान खान मेहबूब खान पठाण (रा. दोघे सुरत, गुजरात) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
हरसूलमार्गे मद्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळाली होती़ या माहितीनुसार बुधवारी (दि़१४) गिरणारे शिवारात सापळा लावण्यात आला होता़  कारमधील या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सुमारे ५ लाख ८५ हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ निरीक्षक एम. बी. चव्हाण, एस. डी. चोपडेकर, दुय्यम निरीक्षक डी. एन. पोटे, एस. एस. रावते, आर. आर. धनवटे, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, श्याम पानसरे यांच्या पथकाने ही कारवाई केली़ दरम्यान, पेठ, हरसूल या मार्गे मोठ्या प्रमाणात अवैध मद्याची तस्करी केली जात असून ती रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे.
कारमध्ये आढळला मद्यसाठा
हरसूलकडून नाशिकच्या दिशेने भरधाव येणाºया स्विफ्ट कारला (जीजे ०५ सीएम ८३१४) अडवून भरारी पथकाने तपासणी केली असता  केवळ दादरा नगरहवेली येथे विक्रीस परवानगी असलेली रॉयल  स्पेशल ओल्ड डिलक्स, आॅफिस चॉईस, ब्ल्यू ग्रीन व्हिस्की, ग्रीन ओडका, किंग फिशर बिअर असा सुमारे १ लाख ८५ हजार २८० रुपयांचे मद्य आढळून आले़

Web Title: Six liquor bottles seized near Girnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.