बॅँकेच्या व्यवस्थापक व सहायक व्यवस्थापकाकडून सहा लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 01:24 PM2018-09-06T13:24:47+5:302018-09-06T13:26:51+5:30

त्यांच्या खात्यातून बॅँकेचे व्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापक या दोघांनी आपआपसांत संगनमत करुन फिर्यादी संगतानी यांच्या खात्यातून सुमारे ६ लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा पोलिवांनी दाखल केला

Six million Apache by the bank's manager and assistant manager | बॅँकेच्या व्यवस्थापक व सहायक व्यवस्थापकाकडून सहा लाखांचा अपहार

बॅँकेच्या व्यवस्थापक व सहायक व्यवस्थापकाकडून सहा लाखांचा अपहार

Next
ठळक मुद्देसहा लाख रुपयांचा अपहारफसवणूकीचा गुन्हा दाखल

नाशिक : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरकरनगरमधील एका सहकारी बॅँकेत शंकर जोधाराम संगतानी (५४, रा.टाकळीरोड) यांचे चालू खाते आहे. त्यांच्या खात्यातून बॅँकेचे व्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापक या दोघांनी आपआपसांत संगनमत करुन फिर्यादी संगतानी यांच्या खात्यातून सुमारे ६ लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा पोलिवांनी दाखल केला आहे. संगतानी यांनी संशयित व्यवस्थापक दंडवते व सहाय्यक व्यवस्थापक परदेशी यांच्याविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. संगतानी यांची कुठलीही संमती न घेता व स्वाक्षरीचा वापर न करता चालू खात्यामधून सहा लाख रुपयांचा अपहार करत ते परस्पर राधेय फोर्जींग नाव्याच्या व्यक्तीच्या खात्यावर जमा करण्यात आल्याचे फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरिक्षक माळी करीत आहेत.
 

Web Title: Six million Apache by the bank's manager and assistant manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.