धनादेश न वटल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:25 AM2018-04-09T00:25:46+5:302018-04-09T00:25:46+5:30
सटाणा : धनादेश न वटल्याप्रकरणी सटाणा न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. बँकेच्या खात्यावर पैसे नसतानाही चार लाख रुपयांचा धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शेमळी येथील दादाभाऊ अर्जुन शेलार यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.

येथील संजय त्र्यंबक सूर्यवंशी यांना पन्नास हजार रु पये व्याजासह चार लाख पन्नास हजार रु पये देण्याचे आदेश न्यायमूर्ती पी. जी. तापडिया यांनी दिले आहेत. तसेच फिर्यादी सूर्यवंशी यांना न्यायालयाचा झालेला खर्च म्हणून दहा हजार रु पये देण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. संजय सूर्यवंशी यांनी दादाभाऊ शेलार यांना मैत्रीच्या संबंधातून व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन वेळा दोन लाख रुपये उसनवार म्हणून दिले होते. सटाणा न्यायालयाने धनादेश न वटल्याप्रकरणी शेलार यांना सहा महिन्यांच्या शिक्षेसह फिर्यादीस साडेचार लाख रु पये व न्यायालयीन खर्चापोटी दहा हजार असे चार लाख साठ हजार रुपये रोख स्वरूपात देण्याचे आदेश दिले आहेत.
शेलार यांनी सूर्यवंशी यांना देना बँकेचा चार लाख रुपयांचा धनादेश दिला होता. ठरलेल्या तारखेला सूर्यवंशी यांनी तो धनादेश आपल्या खात्यावर टाकला असता खात्यात पैसे नाहीत म्हणून तो धनादेश परत आला. धनादेश परत आल्याची कल्पना शेलार यांना देऊनही त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने सूर्यवंशी यांनी सटाणा न्यायालयात दाद मागितली होती.