शहरात कोरोनाचे आणखी सहा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:58 PM2020-06-17T22:58:00+5:302020-06-18T00:40:16+5:30
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत असून, दोन दिवसांपूर्वी एकाच दिवसात आठ रुग्ण दगावले होते, त्यानंतर बुधवारी (दि.१७) एकूण सहा जणांचा बळी गेला. त्यामुळे आता मृतांची संख्या ४६ झाली आहे.
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत असून, दोन दिवसांपूर्वी एकाच दिवसात आठ रुग्ण दगावले होते, त्यानंतर बुधवारी (दि.१७) एकूण सहा जणांचा बळी गेला. त्यामुळे आता मृतांची संख्या ४६ झाली आहे. तर एकाच दिवसात ५३ नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ८६१ वर गेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच आहे. आता बाधितांची आणि मृत्यूची संख्या हादरविणारी ठरली आहे. वाढती रुग्णसंख्या चिंताजनक
शहरात एकाच दिवसात ५३ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ८६१ झाली आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने प्रतिबंधित क्षेत्र १५० झाले आहेत.बाधितांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३३९ झाली आहे.
------------------
शहरात गेल्या आठवड्यात एकाच दिवशी चार जणांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी आठ जणांचा, तर बुधवारी (दि. १७) सहा जणांचा मृत्यू झाला. यात वडाळा येथील एका ५८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. त्यास ४ जून रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
जुने नाशिक आणि परिसरातील काही जणांचा मृत्यू झाला आहे. यात शालिमार येथील ६७ वर्षाचा इसमाचा समावेश आहे. त्यास १५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्याचा मंगळवारी मृत्यू झाला.
गुरुद्वारा रोड भागातील ६५ वर्षीय पुरुषाला मंगळवारी (दि.१६) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दूधबाजारातील ४५ वर्षीय महिलेचादेखील मृत्यू झाला आहे.
पंचवटीतील एका ७० वर्षीय वृद्धाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याला २५ मे रोजी दाखल करण्यात आले होते.
विनयनगर येथील कालिका पेट्रोलपंप परिसरात ४५ वर्षीय इसमाला १० जून रोजी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले होते.