महापालिकेच्या सहा शाळा होणार आता स्मार्ट ई स्कूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:28 PM2021-03-11T23:28:36+5:302021-03-12T00:49:48+5:30
नाशिक- महापालिकेच्या शाळा म्हंटल्या की त्याकडे बघण्याचा एक पारंपारीक दृष्टिकोन असतो. मात्र, त्या पलिकडे जाऊन आता खासगी शाळांशी स्पर्धा करताना त्यांना डिजीटल यंत्रणेचे वापर करून प्रायोगिक तत्वावर सहा विभागातील प्रत्येकी एक अशा सहा स्मार्ट ई स्कूल साकारण्याचा प्रस्ताव असून येत्या महासभेत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

नाशिक महापालिकेच्या अनेक शाळा आता केवळ पायाभूत सुुविधांनीच नाही तर गुणवत्तेने देखील पुढे आहे. मात्र शाळांचे रूप अंर्तबाह्य बदलण्यासाठी आता महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.
महापालिकेच्या शहरात ८९ प्राथमिक आणि १३ माध्यमिक शाळा आहेत. त्यात २८ हजार ४९७ विद्याार्थी शिक्षण घेतात. या सर्व शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता सुधरावी यासाठी स्मार्ट ई स्कूल प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
नवी दिल्लीच्या धर्तीवर स्मार्ट इ स्कूल प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सहा विभागातील प्रत्येकी एक या प्रमाणे सहा शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने सर्वच शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता वाढविणे या हेतूने चांगले शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आयुक्त कैलास जाधव यांनी या प्रकल्पाची आखणी केली आहे. त्यानुसार हा प्रकल्प राबविण्यासाठी खासगी सल्लागाराची सेवा घेऊन प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव मांडण्यात आला आहे. चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात संगणकीकरण, सीसी टिव्ही कॅमेऱ्यासाठी ५० लाख रूपये तर आगामी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
काय असेल ई स्मार्ट स्कूलमध्ये...
- नवीन तंत्रज्ञानानुसार शिक्षकांचे कौशल्य विकसित करणे,
- निवडलेल्या शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास,
- पायलट शाळांमध्ये इनोव्हेशन लॅब उभारणे
- डिजिटल ग्रंथालय
- स्मार्ट ई स्कूल कॅम्पस