नवीन सहा संशयित दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 01:14 AM2020-03-21T01:14:03+5:302020-03-21T01:15:39+5:30

जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २०) आणखी सहा नवीन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले असून, जिल्हा रुग्णालयात दोन, महापालिकेचे जाकीर हुसेन रुग्णालयात तीन, मालेगाव सामान्य रुग्णालयात एक रुग्ण दाखल झाला आहे. या सर्व संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली आहे. यापूर्वी पाठविण्यात आलेल्या स्वॅब पैकी सात अहवाल निगेटिव्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Six new suspects filed | नवीन सहा संशयित दाखल

नवीन सहा संशयित दाखल

Next
ठळक मुद्देसात अहवाल निगेटिव्ह कोरोना कक्षात एकूण १३ संशयित रुग्ण

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २०) आणखी सहा नवीन कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले असून, जिल्हा रुग्णालयात दोन, महापालिकेचे जाकीर हुसेन रुग्णालयात तीन, मालेगाव सामान्य रुग्णालयात एक रुग्ण दाखल झाला आहे. या सर्व संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली आहे. यापूर्वी पाठविण्यात आलेल्या स्वॅब पैकी सात अहवाल निगेटिव्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने पाच संशयितांचे नमुणे तपासणीसाठी घेण्यात आले असून, यात जिल्हा रुग्णालयात नव्याने दाखल झालेल्या एका रुग्णाचा समावेश असून, तो अमेरिकेत एक महिना व लंडनमध्ये चार दिवस राहिलेला आहे, तर जाकीर हुसेन रुग्णालयात दोन व्यक्ती दाखल झाल्या आहेत. हे दोघेही दोन दुबईतून प्रवास करून नाशकात आले आहेत, तर एक संशयित लंडनहून शहरात आला आहे. या तिघांमध्येही कोरोनाचे लक्षणे दिसत नसले तरी त्यांच्या प्रवासाचा इतिहास लक्षात घेऊन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. मालेगाव रुग्णालयात एका संशयिताला दाखल करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४७ संशयित रुग्ण दाखल झाले असून, या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यातील ४१ रुग्णांचे नमुने ४१ निगेटिव्ह आले आहेत, तर अजूनही सहा संशयितांच्या नमुन्यांच्या तपासणी अहवालाची रुग्णालय प्रशासनाला प्रतीक्षा आहे. आतापर्यंत एकूण ४१ रुग्णांना त्यांचे तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत तीनही रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल झालेल्या रुग्णांपैकी कोरोना कक्षात १३ संशयित रुग्ण आहेत.
कोरोना तपासणीची स्थिती
आतापर्यंत विविध कोरोनाग्रस्त देशातून एकूण २०६ नागरिक नाशिकमध्ये आले असून, यातील २६ नागरिकांचे १४ दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहेत, तर १७० नागरिकांचे दैनंदिन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दरम्यान, ज्यांना ताप, खोकला आहे असे सहा संभाव्य कोरोनाग्रस्त रुग्ण शुक्रवारी दाखल झाले आहेत.

Web Title: Six new suspects filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.