सीएसईईटी परीक्षेत नाशिकचे सातपैकी सहा विद्यार्थी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:13 AM2021-05-24T04:13:20+5:302021-05-24T04:13:20+5:30

नाशिक : इंडियन कंपनी सेक्रटरी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या सीएस ईईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या ...

Six out of seven students of Nashik pass CSET exam | सीएसईईटी परीक्षेत नाशिकचे सातपैकी सहा विद्यार्थी उत्तीर्ण

सीएसईईटी परीक्षेत नाशिकचे सातपैकी सहा विद्यार्थी उत्तीर्ण

Next

नाशिक : इंडियन कंपनी सेक्रटरी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या सीएस ईईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे.

आयसीएसआयच्या नाशिक शाखेच्या माध्यमातून सात विद्यार्थ्यांनी सीएसईईटी परीक्षा दिली होती. यातील सात विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले असून

स्नेहल मते हिने दोनशेपैकी सर्वाधिक १३२ गुण संपादन केले आहे. तर अनुराग अधिकारी याने १२८, रक्षित हरपाद १२६, सायली धोंडे ११६, सोनल बागूल १०३ व मनाली जोशी हिने १०० गुण मिळवून या परीक्षेत यश मिळविल्याची माहिती नाशिक शाखा व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. सीएसईईटी निकाल आयसीएसआयच्या संकेत स्थळावरून गुणपत्रिकेसह जाहीर करण्यात आला असून ही परीक्षा देणारे सर्व परीक्षार्थी त्यांचा निकाल संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकणार असल्याची माहिती आयसीएसआयतर्फे देण्यात आली आहे.

Web Title: Six out of seven students of Nashik pass CSET exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.