बिबट्याच्या हल्ल्यात सहाजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 01:55 AM2019-03-11T01:55:09+5:302019-03-11T01:55:31+5:30
इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी येथे भर दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चौघे तसेच वनाधिकाऱ्यासह पंचायत समिती सदस्याचा मुलगा असे एकूण सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. घोटी येथील ग्रामीण रु ग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकच्या शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी येथे भर दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चौघे तसेच वनाधिकाऱ्यासह पंचायत समिती सदस्याचा मुलगा असे एकूण सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. घोटी येथील ग्रामीण रु ग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकच्या शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांनी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी नाशिकच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी गावाजवळ रविवारी (दि.१०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ग्रामस्थांनी कुत्र्यांना पळवून लावताना बिबट्याला पाहिले. तातडीने वनखात्याला त्याची माहिती कळवण्यात आली. यावेळी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत ग्रामस्थही बिबट्याच्या शोधात बाहेर पडले.
बिबट्या नसल्याची सर्वांची खात्री झाली असतानाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने इगतपुरीचे पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी यांचा मुलगा सचिन (वय २०) याच्यावर हल्ला केला. यावेळी हल्ल्याला प्रतिकार करणाºया पंढरीनाथ किसन शेणे (४०), भिवा किसन शेणे (३८), हिरामण पंढरीनाथ शेणे(२०), सागर पंढरीनाथ शेणे (१४) या एकाच कुटुंबातील चौघांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वनपरिमंडळ अधिकारी ओंकार देशपांडे यांच्यासह एकूण सहा जण जखमी झाले. हल्ल्यानंतर बिबट्याने पलायन केले. ग्रामस्थांनी तातडीने सर्व जखमींना घोटी येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ सर्वांना नाशिकच्या शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत घटनेची माहिती समजताच इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांनी नाशिकच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले आहे. दरम्यान, भर दुपारी बिबट्याने हल्ला केल्यामुळे या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी इगतपुरीचे पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी यांनी केली आहे.