बॅँक लूट प्रकरणी सहा जणांना कोठडी

By Admin | Published: May 25, 2015 11:54 PM2015-05-25T23:54:30+5:302015-05-25T23:55:49+5:30

बॅँक लूट प्रकरणी सहा जणांना कोठडी

Six persons robbed for robbery | बॅँक लूट प्रकरणी सहा जणांना कोठडी

बॅँक लूट प्रकरणी सहा जणांना कोठडी

googlenewsNext

येवला : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येवल्यातील लक्ष्मीनारायण रोड शाखेतून जिल्हा बँकेच्याच अंदरसूल शाखेत शाखाधिकारी व शिपाई रिक्षातून ५० लाखांची रोकड घेऊन जात असताना काठीने मारहाण करत रक्कम लुटल्या प्रकरणी सखोल चौकशी अंती तालुका पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. येवला न्यायालयाने या संशयित आरोपींना २८ मे पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती येवला तालुका पोलीस निरीक्षक पी.बी.पाटील यांनी दिली.
अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. मंगळवारी ११ वाजता सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव, नरेश मेघराजानी, पोलीस उपअधीक्षक, मनमाड विभाग, हे या लूट प्रकरणाच्या कार्यवाही संदर्भात पत्रकारांना माहिती देणार आहेत.
या प्रकरणी २२ दिवसांपासून केवळ तपास चालू आहे असेच पोलिसाकडून सांगितले जात होते. दरम्यान, तीन दिवसांपासून तपासाची चक्रे वेगाने फिरली असून, तपासाचे धागेदोरे मिळाल्याची चर्चा तालुकाभर होती. अंदरसूल येथून सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास कामासाठी मनमाड येथे नेले.
या प्रकरणी पोलिसांनी ४० लाखांचा ऐवज हस्तगत केला. यात २७ लाख रु पये रोख, लुटारूनी खरेदी केलेली एक तवेरा गाडी ( एमएच १५, ईएक्स ०२४४) व नंबर प्लेट नसलेली नवी स्प्लेंडर गाडी पोलिसांनी हस्तगत केल्याचे समजते. या प्रकरणी अजित रामदास कोल्हे, नंदकिशोर किसनराव धनगे, शंकर काशीनाथ धनगे, शेख तौशीफ शकील, शंकर भगवान मिसाळ, संतोष गोरख वल्टे यांना पोलिसांनी अधिक तपासासाठी ताब्यात घेतल्याचे समजते. (वार्ताहर)

Web Title: Six persons robbed for robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.