ठाणगावी आरोग्य विभागाच्यावतीने आजार न लपविण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 19:01 IST2020-06-28T18:01:32+5:302020-06-28T19:01:57+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी (दि.२७) चार रु ग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रविवारी (दि.२८) पुन्हा शहरातील मुस्लीम गल्ली व बनकर गल्लीतील ६ जण बाधित ठरल्याने शहरातील रु ग्णसंख्या ३६ झाली आहे.

ठाणगावी आरोग्य विभागाच्यावतीने आजार न लपविण्याचे आवाहन
पिंपळगाव बसवंत : शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी (दि.२७) चार रु ग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रविवारी (दि.२८) पुन्हा शहरातील मुस्लीम गल्ली व बनकर गल्लीतील ६ जण बाधित ठरल्याने शहरातील रु ग्णसंख्या ३६ झाली आहे.
पिंपळगाव शहरात कोरोना रु ग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी नवीन रु ग्ण सापडण्याची मालिका काही खंडित झालेली नाही. कोरोनाचा कहर वाढत आहे. वाढत्या रु ग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. परिसरातील इतरही भागातही कोरोनाचा शिरकाव होऊ लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोवीस तासांत रुग्णसंख्येमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे पिंपळगावकरांची झोपच उडाली आहे. सध्या एकट्या पिंपळगाव शहरातील पॉझिटिव्ह रु ग्णांची संख्या ३६ आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रु ग्णांचा समावेश आहे. आहेरगाव, शिरवाडे हे कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी बनकर गल्लीतील व मुस्लीम गल्लीतील सापडलेल्या कोरोना संक्र मित रु ग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांना क्वॉरण्टाइन करून त्यांच्या घशाचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी ५ रु ग्णांचा अहवाल रविवारी (दि.२८) दुपारी कोरोना संक्र मित आला. त्यात मुस्लीम गल्ली ७६ वर्षीय पुरु ष, ४९ वर्षीय व्यक्तीसह ६५ वर्षीय महिला, तर बनकर गल्ली ३९ वर्षीय महिला व १३ वर्षीय बालक असे ५ रु ग्ण आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील रु ग्णसंख्या ३६ झाली. त्यापैकी ७ जणांची कोरोनावर मात, तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पिंपळगाव प्राथमिक आरोग्य विभागाचे अधिकारी योगेश धनवटे यांनी दिली.