नाशिकमध्ये दिवसभरात सहा साप रेस्क्यू; वातावरण बदलामुळे सापांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 03:27 PM2017-10-31T15:27:07+5:302017-10-31T15:28:24+5:30

Six Snake Rescuers in Nashik; Resolve the snake due to climate change | नाशिकमध्ये दिवसभरात सहा साप रेस्क्यू; वातावरण बदलामुळे सापांचा सुळसुळाट

नाशिकमध्ये दिवसभरात सहा साप रेस्क्यू; वातावरण बदलामुळे सापांचा सुळसुळाट

Next
ठळक मुद्देइको-एको संस्थेच्या वतीने सहा सापांना रहिवासी भागातून रेस्क्यू

नाशिक : वातावरण बदलामुळे शहरात सापांचा सुळसुळाट वाढला असून, दिवसभरात इको-एको संस्थेच्या वतीने सहा सापांना रहिवासी भागातून रेस्क्यू करण्यात आले. गरवारे पॉइंटवरील एका इमारतीच्या आवारातून जाळीमध्ये अडकलेला घोणस जातीचा साप तर इंदिरानगरमधील वडाळा-पाथर्डी रस्त्यावर एका लॉन्समधून धामण जातीचा सर्प रेस्क्यू या संस्थेच्या सर्पमित्रांकडून करण्यात आला. तसेच उपेंद्रनगरमधील एका बंगल्याच्या पाठीमागे संरक्षण भिंतीच्या आतील बाजूने बसलेली धामण पकडण्यात आली. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील शनिमंदिराच्या परिसरात असलेल्या एका बंगल्यातही धामण निघाल्याची घटना घडली.

त्याचप्रमाणे हिरावाडीमधील तांबोळीनगर परिसरातील एका सदनिकेत घोणस जातीचा अत्यंत विषारी जातीचा साप आढळून आला. एकूणच दिवसभरात सहा ते सात साप रहिवासी परिसरातून वेळीच ‘रेस्क्यू’ करण्यात आले. सध्या घोणस जातीच्या सर्पाचा प्रजनन काळ सुरू असून, थंडीच्या चार महिन्यांपर्यंत हा कालावधी असतो. त्यामुळे घोणस हा सर्प बिळाबाहेर येण्याचे प्रमाण वाढते. तसेच जमिनीमध्ये मुरलेल्या पावसाच्या पाण्याची उन्हाच्या तीव्रतेने वाफ होण्यास सुरुवात झाली असून, जमिनीखाली उष्णता वाढू लागल्याने सर्प या हंगामात बिळ सोडून बाहेर पडतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

Web Title: Six Snake Rescuers in Nashik; Resolve the snake due to climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.