गुन्हे शाखेकडून सोळा जणांना अटक लासलगाव : ढोकेश्वर मल्टिस्टेट को-आॅप. सोसायटी ठेवी प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:01 AM2017-12-02T00:01:54+5:302017-12-02T00:03:45+5:30

येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीचे अध्यक्ष सतीश काळे यांच्या अटकेनंतर नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीनंतर सोळा जणांना अटक केली आहे.

   Six suspects arrested in crime branch: Dokeshwar Multistate Co-op Society Deposit Case | गुन्हे शाखेकडून सोळा जणांना अटक लासलगाव : ढोकेश्वर मल्टिस्टेट को-आॅप. सोसायटी ठेवी प्रकरण

गुन्हे शाखेकडून सोळा जणांना अटक लासलगाव : ढोकेश्वर मल्टिस्टेट को-आॅप. सोसायटी ठेवी प्रकरण

Next
ठळक मुद्दे६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीसतीश काळे मध्यवर्ती कारागृहात

लासलगाव : येथील ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीचे अध्यक्ष सतीश काळे यांच्या अटकेनंतर नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीनंतर सोळा जणांना अटक केली आहे. या सोळा जणांना शुक्रवारी निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी. मोहबे यांनी ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ढोकेश्वर मल्टिस्टेट सोसायटीचे अध्यक्ष सतीश काळे गेल्या काही महिन्यापासून नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहेत. या संस्थेच्या संदर्भात पोलीस चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या सहपथकाने गुरुवारी सायंकाळी भाऊसाहेब इंद्रराव शिंदे, रा.देवरगाव, रवींद्र ऊर्फ मनोज जगन्नाथ काळे, विशाल रामचंद बर्वे, रा.चांदवड, गणेश जगताप, सागर सुखलाल चोरडिया, गोरख माणीक महाले, दत्तात्रेय नारायण बोरसे, नवनाथ ऊर्फ बापू रामेश्वर ऊर्फ रामभाऊ होळकर, जगन्नाथ रामभाऊ वैराळ ऊर्फ जगुदादा, ज्ञानेश्वर ऊर्फ नाना श्रीहरी शिंदे, गोरख पुंजाराम कांबळे, अशोक धोंडीराम शिंदे, संजय पोपटराव काळे, भागवत मुरलीधर लोखंडे व मच्छिंद्र भास्कर टोपे, रा.टाकळी, विंचूर यांना अटक केली.

Web Title:    Six suspects arrested in crime branch: Dokeshwar Multistate Co-op Society Deposit Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा