बाधित रुग्णाच्या संपर्कातील १३ संशयित दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:27 PM2020-03-30T23:27:02+5:302020-03-30T23:28:09+5:30
नाशिक : ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेने बाधिताच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयातील नऊ व्यक्तींसह त्याच्यावर उपचार करणाºया दोघा डॉक्टरांसह तेरा संशयितांना उपाययोजना म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. गावातील नागरिकांना आगामी चौदा दिवस क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे अकरा पथके घराघरांत जाऊन आरोग्य तपासणी करणार आहे.
नाशिक : ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेने बाधिताच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयातील नऊ व्यक्तींसह त्याच्यावर उपचार करणाºया दोघा डॉक्टरांसह तेरा संशयितांना उपाययोजना म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. गावातील नागरिकांना आगामी चौदा दिवस क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे अकरा पथके घराघरांत जाऊन आरोग्य तपासणी करणार आहे.
रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला तत्काळ स्वतंत्र कक्षात हलविण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचेही नमुने प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहे. सोमवारी सकाळीच आरोग्य विभागाच्या अकरा पथके ग्रामीण भागात धडकली. बाधिताने प्रारंभी दोघा खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले होते. त्या डॉक्टरांनाही रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. आरोग्य यंत्रणेच्या प्राथमिक चौकशीत सुमारे सोळा जणांशी बाधित रुग्णाचा संबंध आल्याची माहिती मिळत असून, त्यानुसार सोमवारी तेरा संशयितांना दाखल करण्यात आले असून, अन्य तिघे लवकरच दाखल होतील असे सांगण्यात आले.
बाधित रुग्ण निफाड तालुक्यातील असल्यामुळे आरोग्य विभागाने बाधित रुग्णाचे घर, गाव व नजीकच्या गावांवर लक्ष केंद्रित केले असून, अति जोखीम व कमी जोखीम अशा दोन टप्प्यांत नागरिकांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सोमवारी आरोग्य विभागाच्या अकरा पथकांनी, आशा व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्येक घराघरांत जाऊन तेथील ग्रामस्थांची प्राथमिक आरोग्य तपासणी केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. त्यात सर्दी, खोकला, तापाचे लक्षण असणाºया रुग्णांबाबत काळजी घेऊन त्यांना आगामी चौदा दिवस क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.बाधिताच्या संपर्कात ८० व्यक्तींच्या संपर्काचा अंदाजबाधिताच्या संपर्कात गेल्या अठरा दिवसांत जवळपास ८० व्यक्ती आल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, अशा व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान आहे. त्यासाठी
३० वैद्यकीय पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. (सविस्तर पान : २)
नाशकात १५ संशयित दाखल
नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात सोमवारी १५ नवे संशयित दाखल करण्यात आले आहे. त्यात मालेगाव येथील सहा रुग्णांचा समावेश आहे. त्यांचे अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.