सहा आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 09:54 PM2020-01-30T21:54:12+5:302020-01-31T01:01:52+5:30

वाढती महागाई, बेताची आर्थिक परिस्थिती, मजुरीवर उदनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना लग्नकार्याचा आर्थिक भार पडू नये यासाठी आदिवासी भागात आता सामुदायिक विवाह सोहळे पार पडू लागले आहे.

Six tribal couples get married | सहा आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा

तोरणमाळ येथील सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी नवदांपत्यांची पूजा करताना सुवासिनी.

Next
ठळक मुद्देतोरणमाळ : वाढत्या खर्चाला दिला जातोय फाटा

पेठ : वाढती महागाई, बेताची आर्थिक परिस्थिती, मजुरीवर उदनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना लग्नकार्याचा आर्थिक भार पडू नये यासाठी आदिवासी भागात आता सामुदायिक विवाह सोहळे पार पडू लागले आहे.
तोरणमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते कमलेश वाघमारे यांनी आपल्या भागातील गरजू जोडप्यांसाठी मागील वर्षी काळाराम मंदिर देवस्थानच्या सहकार्यातून १९ जोडप्यांचा सामुदाईक विवाह सोहळा घडवून आणला, तर नुकत्याच झालेल्या श्री स्वामी समर्थ संस्थेतर्फे सहा जोडप्यांचे विवाह झाले. यापुढील काळात १०० जोडप्यांचे सामुदायिक विवाह घडवून आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. याप्रसंगी सोपान वाघमारे. हनुमंत वाघमारे, मुरली चौधरी, मयूर गांगुर्डे, डॉ. संतोष वैद्य, दिलीप महाले, मनोज देशमुख आदी उपस्थित होते.
पेठसारख्या आदिवासी भागात लग्न समारंभात होणाºया अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामुदायिक विवाह समारंभात लग्न लावण्यासाठी समाजात जनजागृती होणे आवश्यक असून, यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारचे सामाजिक उपक्र म राबवणे सुरू असून, आदिवासी भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- कमलेश वाघमारे, तोरणमाळ

Web Title: Six tribal couples get married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.