जिल्ह्यात लढल्या सहा महिला, मात्र पदरी अपयशच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 01:18 AM2019-03-20T01:18:05+5:302019-03-20T01:18:20+5:30

देशाच्या संसदीय राजकारणात महिला लोकप्रतिनिधींनीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. महाराष्टÑातील अहल्या रांगणेकर, मृणाल गोरे, केशरबाई क्षीरसागर, प्रमिला दंडवते, प्रतिभाताई पाटील यांच्यासह काही महिला खासदारांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला असताना गेल्या ६८ वर्षात क्रांतिकारकांची भूमी असलेल्या नाशिक जिल्ह्यातून लोकसभेची निवडणूक लढलेल्या सहा महिला उमेदवारांपैकी एकिलाही संसदेची पायरी चढता आलेली नाही.

Six women fight in the district, but only failure! | जिल्ह्यात लढल्या सहा महिला, मात्र पदरी अपयशच!

जिल्ह्यात लढल्या सहा महिला, मात्र पदरी अपयशच!

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : राष्टÑीय पक्षांकडून उमेदवारीबाबत महिलांची उपेक्षा

नाशिक : देशाच्या संसदीय राजकारणात महिला लोकप्रतिनिधींनीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. महाराष्टÑातील अहल्या रांगणेकर, मृणाल गोरे, केशरबाई क्षीरसागर, प्रमिला दंडवते, प्रतिभाताई पाटील यांच्यासह काही महिला खासदारांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला असताना गेल्या ६८ वर्षात क्रांतिकारकांची भूमी असलेल्या नाशिक जिल्ह्यातून लोकसभेची निवडणूक लढलेल्या सहा महिला उमेदवारांपैकी एकिलाही संसदेची पायरी चढता आलेली नाही.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघातून १९६२ मध्ये आंबेडकरी चळवळीच्या सक्रीय कार्यकर्त्या आणि समाजसेविका शांताबाई धनाजी दाणी या लोकसभा निवडणुक रिंगणात उतरल्या होत्या. त्यावेळी लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या होत्या. आॅल इंडिया रिपब्लिकन पार्टीकडून निवडणूक लढविली परंतु, तिरंगी लढतीत त्यांना भारतीय राष्टÑीय कॉँगे्रसचे माधवराव जाधव यांनी पराभूत केले होते. दाणी यांनी त्यावेळी ५७ हजार ४२८ इतकी म्हणजे १९.६० टक्के मते घेतली होती. त्यानंतर शांताबाई दाणी यांनी १९८० मध्ये मालेगाव ऐवजी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. मात्र, त्यावेळीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. दाणी यांना अवघी २५५३ मते मिळविता आली होती. १९८९मध्ये नाशिक मतदारसंघातून बसपाच्या लीला गोपीचंद कांबळे यांनी निवडणूक लढविली. त्यांनाही पराभव पत्करावा लागला. १९९१ मध्ये मालेगाव मतदारसंघातून कुसुमताई भिवराज सोनवणे लोकदल या पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. अवघी ७०९ मते मिळून त्या पराभूत झाल्या. पुढे २००४ मध्ये विमलताई निवृत्ती आव्हाड आणि लता भिका बर्डे या महिलांनी नाशिक मतदारसंघातून नशिब अजमावून पाहिले. परंतु, विमलतार्इंना ७९१७ तर बर्डे यांना ३९८२ मते घेता आली होती. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुनर्रचनेत झालेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्टÑवादी कॉँग्रेसकडून माजी मंत्री ए.टी. पवार यांच्या स्नुषा डॉ. भारती प्रवीण पवार यांनी भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यापुढे आव्हान उभे केले होते. परंतु, भारती पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, पवार यांनी २ लाख ९५ हजार मते घेऊन भाजपा उमेदवाराला कडवी लढत दिली होती.
नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत ६ महिला लढल्या. त्यात शांताबाई दाणी यांनी दोनदा निवडणूक लढविली परंतु, त्यांनाही संसद गाठता आली नाही. महाराष्टÑ विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून काही महिलांनी यशाची पताका फडविली असताना दिल्लीच्या राजकारणात मात्र अद्याप एकाही महिलेला शिरकाव करता आलेला नाही. विशेष म्हणजे, जिल्ह्यात राष्टÑीय पक्षांकडून उमेदवारीच्या बाबतीत अपवाद वगळता आजवर महिलांवर विश्वास टाकण्यात आल्याचे दिसून येत नाही.
शांताबाई दाणी यांना विधान परिषदेवर संधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब गायकवाड यांच्यासमवेत काम करणाऱ्या शांताबाई दाणी यांना विधानसभा निवडणुकीतही हार पत्करावी लागली होती. १९४६ मध्ये त्यांनी मुंबई विधानसभा निवडणूक लढवली होती परंतु, त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी १९५२ मध्ये सिन्नर-निफाड मतदारसंघातून नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला होता. तेथेही अपयश पदरी पडले होते. मात्र, १९६८ ते १९७४ या कालावधीत त्यांनी विधानपरिषदेवर लोकप्रतिनिधीत्व केले होते. आमदार म्हणून शांताबार्इंना संधी मिळाली परंतु, दोनदा लोकसभा निवडणुक लढवूनही त्यांना खासदार होता आले नाही.

Web Title: Six women fight in the district, but only failure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.