लखनौला पायी निघालेले सहा तरु ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 08:52 PM2020-05-10T20:52:15+5:302020-05-10T20:53:47+5:30
नांदगाव : मनात एकच विचार.... काहीही करून घर गाठायचे. वाहनांची सोय नसली तर पायीच जायचे असा निर्धार करून उत्तर प्रदेशला निघालेले सहा तरुण नांदगावमधील नागरिकांच्या औत्सुक्याचा विषय बनले. शिरूर (घोडनदी) येथे दोन महिन्यांपासून कारखाना सुरू होण्याच्या प्रतीक्षेत थांबूनही, परिस्थितीत काहीच आशादायी चित्र दिसत नव्हते. म्हणून मनाचा हिय्या करून, पायीच उत्तर प्रदेशला जाण्यासाठी ते निघाले.
नांदगाव : मनात एकच विचार.... काहीही करून घर गाठायचे. वाहनांची सोय नसली तर पायीच जायचे असा निर्धार करून उत्तर प्रदेशला निघालेले सहा तरुण नांदगावमधील नागरिकांच्या औत्सुक्याचा विषय बनले. शिरूर (घोडनदी) येथे दोन महिन्यांपासून कारखाना सुरू होण्याच्या प्रतीक्षेत थांबूनही, परिस्थितीत काहीच आशादायी चित्र दिसत नव्हते. म्हणून मनाचा हिय्या करून, पायीच उत्तर प्रदेशला जाण्यासाठी ते निघाले. नांदगाव येथून जात असताना शनि मंदिराजवळ काही नागरिकांनी त्यांना थांबवून त्यांची विचारपूस करून त्यांना खायला दिले. येथील शासकीय निवारा व्यवस्थेची माहिती देऊनही त्यांनी थांबण्यास नकार दिला.
शिरूर येथील स्टील कंपनीमध्ये कंत्राटी मजूर म्हणून दोन वर्षे ते काम करीत होते. उन्हाळ्यात शिरूर ते लखनौ हे १५०० किमीचे अंतर पायी पार करण्यासाठी ते तरुण निघाले होते.
कोरोनामुळे ‘घरी तिकडे’ काही झाले तर काय? अशी भीती वाटू लागली आणि आम्ही ‘कुछ भी हो, निकलते है चले जाएंगे... तो निकल पडे’ अशा शब्दात तरु णांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व त्यांनी नांदगाव सोडले. गेल्या महिन्यात कंटेनरमधून राजस्थान व मध्य प्रदेशातील आपल्या गावी जाणारे १८ जण नांदगाव येथे निवारागृहात थांबवून ठेवण्यात आले आहे. त्यांनाही आपल्या घरी जायचे आहे.