विनामास्क विरोधात सोळा गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 06:49 PM2020-06-24T18:49:28+5:302020-06-24T18:50:49+5:30

लासलगाव : कोरोना वाढत असतांना बेफिकीर नागरिक विनामास्क फिरत असल्यामुळे कोरोनाला प्रतिबंध व्हावा यासाठी लासलगाव पोलिसांनी लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचेसह कर्मचारी कैलास महाजन व यांनी मास्क न लावता फिरणारे नागरिकांचे विरोधात परत मोहीम कडक केली असुन काल दिवसभरात विविध कलमान्वये सोळा गुन्हे दाखल करून न्यायालयात हजर केले अहता तीनशे रूपया प्रमाणे न्यायालयात चोपन्नशे रूपयांची दंडाची रक्कम ठोठावली आहे.

Sixteen charges filed against Vinamask | विनामास्क विरोधात सोळा गुन्हे दाखल

विनामास्क विरोधात सोळा गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देलासलगाव : चोपन्नशे रूपयांची दंडाची रक्कम वसुल

लासलगाव : कोरोना वाढत असतांना बेफिकीर नागरिक विनामास्क फिरत असल्यामुळे कोरोनाला प्रतिबंध व्हावा यासाठी लासलगाव पोलिसांनी लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचेसह कर्मचारी कैलास महाजन व यांनी मास्क न लावता फिरणारे नागरिकांचे विरोधात परत मोहीम कडक केली असुन काल दिवसभरात विविध कलमान्वये सोळा गुन्हे दाखल करून न्यायालयात हजर केले अहता तीनशे रूपया प्रमाणे न्यायालयात चोपन्नशे रूपयांची दंडाची रक्कम ठोठावली आहे.
लासलगाव येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू असतात. परंतु काही लालची व्यवसायीक पाच वाजेनंतर इशारा भोंगा झाल्यानंतरही दुकाने सुरू ठेवतात ह पाहुन आता अचानक विविध भागात लासलगाव पोलिसांची जिप फिरून कारवाई करीत आहे.
तसेच लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी व्यवसाय करतांना ग्राहकांना मास्क नसतांना व्यवहार करणारे व्यवसायीक तसेच रस्त्यावर मास्कशिवाय फिरणारे लोक यांच्या विरूध्द कारवाई सुरू केली आहे.काल सात लोकांना पकडुन गुन्हा दाखल करून प्रत्येकी दंडात्मक तीनशे रूपये ची कारवाई केलेली आहे चोवीसशे रूपये दंड वसुल झाला होता आजही मोहीम अधिक कडक झाली आहे. आज बुधवारी दहा व्यक्तींना न्यायालयात हजर केले असता तीन हजार रूपयांची दंडाची रक्कम नागरिकांनी भरली आहे.

Web Title: Sixteen charges filed against Vinamask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.