दिंडोरी तालुक्यात दोन दिवसात सोळा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 02:31 PM2020-08-07T14:31:43+5:302020-08-07T14:32:54+5:30
दिंडोरी: कोरोना ग्रामीण भागात पसरत असून तालुुक्यात दोन दिवसात १६ रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आढळले.
दिंडोरी: कोरोना ग्रामीण भागात पसरत असून तालुुक्यात दोन दिवसात १६ रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आढळले. कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे. दिंडोरी तालुक्यात मंगळवारी ७ तर बुधवारी ९ रोजी ९ बाधित आढळले. गेल्या काही दिवसात कोरोनाची साखळी तुटल्याचे दिसून येत होते. परंतु दोन दिवसात आढळलेल्या रुग्णांमुळे करोना ग्रामीण भागात पसरलेला दिसतो. शहरातील टेलिफोन कॉलनीत सहा वर्र्षीय मुलाला करोनाची लागण झाली. त्याचप्रमाणे लक्ष्मी अपाटर्मेटमध्ये ३४ वर्र्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली. वरखेडा गावात चार जणांना कोरोना झाल्याचे आढळले. वरखेडा येथे दोन महिला व एक पुरुष, एक बालक यांना करोनाची लागण झाली. मडकीजांब येथे ५० वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. खडकसुकेणे येथेही ५० वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली. दोन दिवसांपुर्वी धुमाळ कंपनीचा एक कामगार बाधित झाला आहे. वणी येथे २३ वर्षीय तरुण व रामशेज येथेही २६ वर्र्षीय तरुण करोना पॉझिटिव्ह आला आहे. तुंगलदरा येथे १ पुरुष, एक ७ व एक ८ वर्षीय मुलगा कोरोना बाधित झाले आहे. आढळलेल्या रुग्णांमुळे ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढत चालल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.