पहिल्या टप्प्यात सोळा हजारांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:31 AM2020-12-16T04:31:34+5:302020-12-16T04:31:34+5:30
केंद्र सरकारच्या आदेशानुसार आरोग्य विभागाने यासंदर्भातील तयारी डिसेंबरअखेर पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी सध्या तालुका वैद्यकीय अधिकारी व मेडिकल ...
केंद्र सरकारच्या आदेशानुसार आरोग्य विभागाने यासंदर्भातील तयारी डिसेंबरअखेर पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी सध्या तालुका वैद्यकीय अधिकारी व मेडिकल अधिकाऱ्यांना लसीकरणाबाबत ऑनलाइन प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कार्यरत १२ हजार ६४४, तर जिल्हा शासकीय रुग्णालयांतर्गंत २७९१ या शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच खासगी रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांनाही पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणाबाबत प्रत्येक आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांचे आधारकार्ड, नावे, पत्ते गोळा करण्यात आले आहेत.
शासनाकडून कोणती लस येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, लस आल्यानंतर त्यासाठी विशिष्ट तापमानात ठेवण्याची व्यवस्था केली जात आहे. लसीकरण करताना प्रत्येक व्यक्तीला लस दिल्यावर अर्धा तास केंद्रातच थांबावे लागणार आहे. लस दिल्यानंतर त्याचे काही परिणाम यानिमित्ताने पाहता येतील.
चौकट==
खासगी रुग्णालयांची उदासीनता
शासनाने शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्याचे ठरविले असून, त्यासाठी त्यांची माहिती गोळा केली जात आहे. मात्र एक महिना उलटूनही खासगी रुग्णालयांकडून अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. त्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती न देणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा दिल्याचे सांगण्यात आले.