लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:22 AM2021-05-05T04:22:47+5:302021-05-05T04:22:47+5:30

टाकळी विंचूरसह १६ गावांना पाणीपुरवठा करणारी सोळागाव पाणीयोजना नादुरुस्त झाल्याने, गेल्या वीस दिवसांपासून गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे ...

Sixteen villages, including Lasalgaon, leaked to the water supply scheme | लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेला गळती

लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेला गळती

Next

टाकळी विंचूरसह १६ गावांना पाणीपुरवठा करणारी सोळागाव पाणीयोजना नादुरुस्त झाल्याने, गेल्या वीस दिवसांपासून गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. १६ गाव पाणी योजना ही अत्यंत जुनी झाल्याने यामध्ये लावलेले पाइप जीर्ण झालेले आहेत. त्यामुळे वारंवार पाइपलाइन फुटणे, लीकेज होणे, मोटारी जळणे अशा अनेक कारणांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. यासाठी पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुरासे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावेळी भुजबळ यांनी या कामासाठी निधीची तरतूद केलेली असून, लवकरच या कामाला सुरुवात करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

दरम्यान, लासलगाव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी सांगितले. लासलगाव येथील नागरिकांना पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन ही गाजरवाडी, दिंडोरी येथे मोठ्या प्रमाणावर फुटलेली आहे. १६ गावांना पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन ही नदीतून गेलेली आहे. नदीमध्ये असलेले पाइप हे पूर्णपणे जीर्ण झालेले असून, पावसाळ्यात नदीला पाणी आल्यानंतर पाइपलाइन लीकेज काम करता येणार नाही. त्यामुळे नदीमध्ये असलेले काही पाइप बदलण्याचे काम चालू करण्यात आले आहे. पाइपलाइप बदलण्याच्या कामास ४ ते ५ दिवस लागणे अपेक्षित आहे, तोपर्यंत गावात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

इन्फो

पाणीपुरवठा विस्कळीत

पाणीटंचाई कालावधीत नागरिकांनी लासलगाव ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केले आहे.

विंचूर ते नांदूर मध्यमेश्वरपर्यंत सोळा गाव पाणीपुरवठा योजनेची त्यांनी पाहणी केली असता, बऱ्याच ठिकाणी गळती मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून टाकळी विंचूर येथे पाणीपुरवठा बंद आहे . सातत्याने पंधरा-पंधरा दिवस पाणीपुरवठा होत नाही. त्यात येणारा मोठा खर्च व वीजबिल भरण्यासाठी सोळा गाव समितीकडे तरतूद नाही. अशा एक ना अनेक समस्यांत सदरची पाइपलाइन अडकली असून, यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

फोटो - ०४ लासलगाव वॉटर-१

०४ लासलगाव वॉटर-२

===Photopath===

040521\04nsk_12_04052021_13.jpg~040521\04nsk_13_04052021_13.jpg

===Caption===

फोटो - ०४ लासलगाव वॉटर-१~०४ लासलगाव वॉटर-२ 

Web Title: Sixteen villages, including Lasalgaon, leaked to the water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.