षोडशी सोहळा पार पडला त्र्यंबकेश्वरला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 09:48 PM2020-11-05T21:48:56+5:302020-11-06T01:58:32+5:30

त्र्यंबकेश्वर : कल्याण नेतीवली स्थित आश्रमात वास्तव्यास असलेले श्रीपंच दशनाम जुना अखाड्याचे महामंडलेश्वर श्रीमहंत प्रकाशानंदगिरीजी महाराज हे नुकतेच ब्रमहलिन ...

Sixteenth ceremony passed to Trimbakeshwar! | षोडशी सोहळा पार पडला त्र्यंबकेश्वरला !

षोडशी सोहळा पार पडला त्र्यंबकेश्वरला !

Next
ठळक मुद्देजुना अखाडा महामंडलेश्वर ब्रम्हलिन श्रीमहंत प्रकाशानंदगिरी महाराज

त्र्यंबकेश्वर : कल्याण नेतीवली स्थित आश्रमात वास्तव्यास असलेले श्रीपंच दशनाम जुना अखाड्याचे महामंडलेश्वर श्रीमहंत प्रकाशानंदगिरीजी महाराज हे नुकतेच ब्रमहलिन झाले. त्यांचा समाधी सोहळा आज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जुना अखाड्याचे अखिल भारतीय संरक्षक महंत तथा अखिल भारतीय अखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज व अन्य चार महामंडलेश्वर व सुमारे शे दिडशे महात्म्यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी श्रीमहंत प्रकाशानंद गिरीजी महाराज यांचा मोठा शिष्य परिवार जुना अखाड्याचे महात्मा व त्र्यंबकेश्वर येथील अखाडे मठ आश्रम येथील साधुमहंत आवर्जुन उपस्थित होते.
निलपर्वता वरील निलांबिका मटम्बा मायेच्या मंदीरामागे महामंडलेश्वर ब्रम्हदेव प्रकाशानंद गिरीजी महाराज यांना समाधी देण्यात आली. लवकरच समाधीवर मंदिर उभारण्यात येईल. असे महाराजांच्या शिष्य परिवाराने सांगितले. यावेळी स्नेहभोजनाचा भंडारा करण्यात आला होता. तसेच ब्रम्हलिन प्रकाशानंदगिरीजी महाराज यांना उपस्थित साधुमहंतां तर्फे श्रध्दांजली पर कार्यक्रम पार पडला.
यावेळी महामंडलेश्वर श्रीकृष्णदेवगिरीजी महाराज महामंडलेश्वर श्रीमहंत आभानंदगिरीजी महाराज महामंडलेश्वर श्रीशिवगिरीजी महाराज श्रीमहंत शंकरानंद सहजानंद गिरीजी यतिजी महंत राजिन्दरसिंह महंत दिनेशपुरीजी महाराज महानिर्वाणी अखाडा आकाशानंदगिरी शिवानंदपुरीजी गिरीजानंद सरस्वती सर्वानंद सरस्वती महंत विष्णुगिरीजी महाराज संतोषपुरीजी महाराज तिरथदास बालकमुनीजी महाराज दिव्यानंदगिरी महाराज कृष्णबोधानंद गिरी दिपकगिरी महाराज धनराजगिरीजी महाराज महंत चेतननाथ महाराज सुखदेवानंद गिरी परशुरामगिरीजी
महाराज आदी उपस्थित होते.

Web Title: Sixteenth ceremony passed to Trimbakeshwar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.