परप्रांतीयांना घेऊन धावली सहावी ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 10:15 PM2020-05-20T22:15:32+5:302020-05-20T23:58:58+5:30

नाशिक : जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात कामधंदा करणाºया परप्रांतीय मजुरांनी गावाकडची वाट धरली असून, रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून सुमारे चाळीस हजारांवर परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. यामध्ये बसेसने प्रवास करणाºया मजुरांची संख्या सर्वाधिक आहे, तर बुधवारी सकाळी नाशिकरोड रेल्वेस्टेशनमधून मजुरांना घेऊन सहावी ट्रेन बिहारच्या दिशेने धावली.

 The sixth train carrying foreigners | परप्रांतीयांना घेऊन धावली सहावी ट्रेन

परप्रांतीयांना घेऊन धावली सहावी ट्रेन

Next

नाशिक : जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात कामधंदा करणाºया परप्रांतीय मजुरांनी गावाकडची वाट धरली असून, रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून सुमारे चाळीस हजारांवर परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. यामध्ये बसेसने प्रवास करणाºया मजुरांची संख्या सर्वाधिक आहे, तर बुधवारी सकाळी नाशिकरोड रेल्वेस्टेशनमधून मजुरांना घेऊन सहावी ट्रेन बिहारच्या दिशेने धावली.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे जिल्ह्यातील मजुरांचे लोंढे गावाच्या दिशेने निघाले आहेत. गावाकडे जाणाऱ्यांना मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून रेल्वे गाड्या तसेच बसेसची व्यवस्था केली जात आहे. गावी जाण्यासाठी तहसीलदारांकडे नोंदणी केलेल्या आणि संबंधित राज्यांकडून एनओसी प्राप्त झाल्यानंतर संबंधित मजुरांसाठी श्रमिक रेल्वे गाडीची व्यवस्था केली जाते. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून आत्तापर्यंत सहा रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत तर एक गाडी औरंगाबाद येथून सुटल्याने नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना सदर गाडीतून रवाना करण्यात आले. या सर्व गाड्यांमधून ७४५३ मजुरांनी प्रवास केला आहे.
बुधवारी (दि.२०) नाशिक ग्रामीण विभागातून सहावी रेल्वे गाडी बिहार राज्यातील हाजीपूर येथे १५८७ प्रवाशांना घेऊन रवाना झाली. या प्रवाशांच्या तिकिटाचे सुमारे ११ लाख रुपये महाराष्टÑ शासनाने भरले आहेत. गेल्या नऊ तारखेपासून सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीत सर्वाधिक प्रवासी हे उत्तर प्रदेशचे आहेत. ग्रामीण भागात अजूनही तहसीलदारांकडे परप्रांतीय मजुरांकडे नावनोंदणी सुरूच असून, येत्या ३१ तारखेच्या आत जास्तीत जास्त प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची तयारी केली जात आहे.
जिल्ह्यातील प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनानुसार शहरी भागाची जबाबदारी ही महापालिका आणि पोलीस उपायुक्तांकडे देण्यात आलेली आहे, तर ग्रामीण भागातील जबाबदारी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सांभाळत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीतून सर्वाधिक ३३ हजार ८८३ प्रवाशांची वाहतूक अनेक राज्यांमध्ये करण्यात आलेली आहे. राजस्थान, बिहार, केरळ, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, ओडिशा आदी राज्यांतील प्रवाशांची वाहतूक करण्यात आलेली आहे.
-----------------------------------------------
जिल्ह्यातील प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठीच्या जबाबदारीचे नियोजन यापूर्वीच करण्यात आलेले आहे. मनपा हद्दीसाठी मनपा उपायुक्त व पोलीस उपायुक्त हे नोडल अधिकारी आहेत. तर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी ग्रामीण भागासाठी कामकाज पाहात आहेत.
- नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी

Web Title:  The sixth train carrying foreigners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक