स्वाइन फ्लूमुळे शहरात सहावा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:19 AM2019-04-25T01:19:49+5:302019-04-25T01:20:14+5:30
शहरात स्वाइन फ्लूचा कहर सुरूच असून, आता सहावा संशयित रुग्ण दगावला आहे. आतापर्यंत १२८ जणांना लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचा कहर सुरूच असून, आता सहावा संशयित रुग्ण दगावला आहे. आतापर्यंत १२८ जणांना लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नाशिक महापालिकेच्या हद्दीत आत्तापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीणमधील दहा तसेच अहमदनगर येथील तीन आणि जळगावमधील एकाचा समावेश आहे. उर्वरित पाच नाशिक शहरातील आहे. सहाव्या संशयिताचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळेच झाला आहे किंवा नाही याबाबत निदानाचा अंतिम अहवाल आल्यानंतर गुरु वारी (दि. २५) त्याबाबत अंतिम खातरजमा करण्यात येणार आहे.
नाशिकमध्ये गेल्यावर्षी स्वाइन फ्लूमुळे केवळ एकाचा मृत्यू झाला होता. परंतु यंदा जानेवारी महिन्यापासून स्वाइन फ्लूची लागण सुरू झाली. जानेवारी महिन्यातमध्ये सात, फेब्रुवारी महिन्यात ४२ आणि मार्च महिन्यात ४८ रु ग्ण आढळून आले. तर एप्रिल ३१ रु ग्ण २२ तारखेपर्यंत आढळले आहेत.
नाशिक शहरात सिडको भागात २२ रु ग्ण आढळले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक पूर्व विभागात ३३ रु ग्ण तर नाशिकरोड विभागात ३४ रु ग्ण आढळले असून, प्रत्येकी एक रु ग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वच विभागात काळजी घेतली जात आहे.
नाशिक शहरात स्वाइन फ्लूचा वाढता संसर्ग लक्षात घेता नाशिक महापालिकेने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना उपचारात हलगर्जीपणा केल्यास फौजदारी कारवाई करण्याची
उन्हाने रोगाचा प्रादुर्भाव कमी होणार
उन्हाच्या कडाक्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी वर्तवली आहे. नाशिकमध्ये ४० ते ४१ अंश सेल्सिअस इतके तापमान असून, त्यामुळे विषाणूंचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.