बॅँकेच्या निवडणुकीसाठी सिडकोत २६ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:00 AM2018-12-24T01:00:19+5:302018-12-24T01:00:34+5:30
दि नाशिक मर्चंट को-आप. बॅँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. सिडको भागात चार मतदान केंद्रांवर एकूण १४ हजार ९७६ मतदारांपैकी ३ हजार ८९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सिडको भागात शांततेत व कडक पोलीस बंदोबस्तात एकूण २६ टक्के मतदान झाले.
सिडको : दि नाशिक मर्चंट को-आप. बॅँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. सिडको भागात चार मतदान केंद्रांवर एकूण १४ हजार ९७६ मतदारांपैकी ३ हजार ८९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सिडको भागात शांततेत व कडक पोलीस बंदोबस्तात एकूण २६ टक्के मतदान झाले.
दि नाशिक मर्चंट को-आॅपरेटीव्ह बॅँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि.२३) मतदान घेण्यात आले. सिडको भागात एकूण १४ हजार ९७६ इतके मतदार असून, यातील ३ हजार ८९७ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सिडकोत गणेश चौक येथील मनपाच्या सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेत १० बूथवर ५ हजार ५४६ इतके मतदान होते. त्यापैकी एक हजार २०७ इतके मतदान झाले. त्रिमूर्ती चौक येथील पेठे विद्यालयात ८ बूथवर ४ हजार ४८० इतके मतदान होते, त्यापैकी एक हजार २७७ मतदान झाले. तर कामटवाडे येथील मॉसाहेब मीनाताई ठाकरे विद्यालयात ७ बूथवर ३ हजार ७७७ मतदारांपैकी एक हजार २९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर अंबड येथील मनपा शाळेत ३ बूथवर एक हजार ६४२ मतदारांपैकी ३८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ करण्यात आला.
सिडको भागात बहुतांशी कामगारवर्ग असून रविवारचा दिवस असला तरी कामगारांना शनिवारी सुट्टी असते. कामगारांच्या सुट्टीच्या दिवशी मतदान असते तर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असते, अशी चर्चा मतदान केंद्राबाहेर सुरू होती.