सियावर रामचंद्र की जय... श्रीराम व गरुड रथयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:33 AM2019-04-17T01:33:48+5:302019-04-17T01:34:15+5:30

जय सीता राम सीता, सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय’ असा जय जयकार करीत ढोलताशांच्या गजरात व रामभक्तांच्या अमाप उत्साहात मंगळवारी (दि.१६) सायंकाळी श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून श्रीराम व गरुड रथयात्रा काढण्यात आली.

Siyar Ramchandra Ki Jai ... Shriram and Garuda Rath Yatra | सियावर रामचंद्र की जय... श्रीराम व गरुड रथयात्रा

सियावर रामचंद्र की जय... श्रीराम व गरुड रथयात्रा

googlenewsNext

पंचवटी : जय सीता राम सीता, सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय’ असा जय जयकार करीत ढोलताशांच्या गजरात व रामभक्तांच्या अमाप उत्साहात मंगळवारी (दि.१६) सायंकाळी श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून श्रीराम व गरुड रथयात्रा काढण्यात आली. कामदा एकादशीनिमित्ताने होणाऱ्या या रथोत्सवात भाविकांचा लक्षणीय सहभाग होता.
नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाºया यंदाच्या उत्सवाचे मानकरी श्रीकांतबुवा पूजाधिकारी यांच्या हस्ते गरुडरथात रामाच्या पादुका व रामरथात भोगमूर्ती प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली. बुवांनी आदेश देताच हिरवा ध्वज दाखवून पारंपरिक मार्गाने रथ ओढण्यास सुरु वात झाली.
प्रारंभी रथाच्या मानकऱ्यांना गंध लावून श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. राममंदिरातून भोगमूर्तीची व पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दोन्ही रथ रांगेत उभे करण्यात येऊन श्रीकांतबुवा यांच्या हस्ते मुख्य आरती होताच फटाक्यांची आतषबाजी करून पारंपरिक मार्गाने रथ ओढण्यास सुरु वात झाली. सुरुवातीला गरु डरथ व काही वेळाने रामरथ निघाला. रथाच्या अग्रभागी पालखी तर मध्यभागी श्रीकांतबुवा रथाकडे तोंड करून उलट्या दिशेने मार्गक्रमण करत होते. दरम्यान, रथयात्रा सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, जयंत जाधव, शोभा बच्छाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, माजी महापौर दशरथ पाटील, डॉ. सुनील ढिकले, अ‍ॅड. राहुल ढिकले, गुरमित बग्गा, प्रियंका माने, उद्धव निमसे, रूची कुंभारकर, राकेश शेळके, नितीन शेलार, सचिन लाटे, मंदार जानोरकर, मंडलेश्वर काळे, अजय निकम, आदींनी दर्शन घेतले.
गरुड व रामरथाचे सूत्रसंचालन रघुनंदन मुठे, चंदन पुजारी यांनी केले. रथोत्सव यशस्वी करण्यासाठी रास्ते आखाडा तालीम संघ, अहिल्याराम व्यायामशाळा, समस्त पाथरवट समाजातील पंच, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
रथयात्रा मार्ग
राममंदिर पूर्व दरवाजा येथून निघालेली रथयात्रा ढिकलेनगर, नागचौक, चारहत्ती पूल, काट्या मारुती चौक, जुना आडगावनाका मार्गे, गणेशवाडीमार्गे गौरी पटांगण, म्हसोबा महाराज पटांगणापर्यंत काढण्यात आली. रामरथ नदी ओलांडत नसल्याने रथ म्हसोबा पटांगणावर थांबविण्यात आला. गरुडरथ नेहरू चौक, दिल्ली दरवाजा, धुमाळ पार्इंट, मेनरोड, बोहरपट्टी, सरकारवाडा, सराफ बाजार, भांडीबाजार, कपूरथळा मैदान परिसरातून मिरविण्यात आला नंतर दोन्ही रथ रामकुंड येथे आणले तेथे ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य केले.
रथोत्सव मार्गावर महिला भाविकांनी रांगोळ्या काढलेल्या होत्या, तर रथाचे स्वागत करण्यासाठी शुभेच्छा फलक लावले होते. रथोत्सवात सहभागी झालेल्या महिलांनी पिवळ्या, भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. रामभक्तांनी अंगावर पांढरा सदरा परिधान करून फेटा, कपाळावर अष्टगंध लावले होते. गरुडरथ मान अहिल्याराम व्यायामशाळा, तर रामरथ मान सरदार रास्ते आखाडा तालीम संघ पाथरवट समाजाकडे असल्याने मानकरी रथाच्या अग्रभागी रथ ओढत होते. रथोत्सवात ढोलपथक, सहभागी झाले होते. रामरथाला एलइडी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
नाशिकचा ग्रामोत्सव
दरवर्षीप्रमाणे पारंपारिक पद्धतीने निघणाºया श्रीराम व गरूड रथयात्रेसाठी जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ काळाराम मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांवर रामभक्तांची मोठी गर्दी झाली होती़ भगवे ध्वज हातात घेऊन नाशिकच्या या ग्रामोत्सवात सहभागी झालेल्या भाविकांच्या गर्दीमधून प्रभूरामचंद्रांचा जयघोष घुमत होता़

Web Title: Siyar Ramchandra Ki Jai ... Shriram and Garuda Rath Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.