विजेच्या आधुनिक चाकावर मिळणार मातीला आकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:29 AM2019-05-28T00:29:27+5:302019-05-28T00:29:55+5:30
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबक विद्यामंदिर येथे आयोजित दहादिवसीय कुंभारकाम प्रशिक्षण वर्गाचा समारोप खादी ग्रामोद्योगचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव खन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र आणि आधुनिक यंत्रे मोफत वाटप करण्यात आली. पारंपरिक चाकावरील मातीला आकार देण्याचे काम आता विजेच्या चाकावर होणार आहे.
सातपूर : केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबक विद्यामंदिर येथे आयोजित दहादिवसीय कुंभारकाम प्रशिक्षण वर्गाचा समारोप खादी ग्रामोद्योगचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव खन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र आणि आधुनिक यंत्रे मोफत वाटप करण्यात आली. पारंपरिक चाकावरील मातीला आकार देण्याचे काम आता विजेच्या चाकावर होणार आहे.
बुधवारी दुपारी या प्रशिक्षण शिबिराचा समारोप केंद्रीय खादी ग्रामोद्योग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव खन्ना, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव जगदाळे, माती कला विभागाचे राष्ट्रीय चेअरमन दत्तात्रय डाळजकर, रंगनाथ सूर्यवंशी, सोमनाथ सोनवणे, राजेंद्र सावंदे, गणेश आहेर, अशोक प्रजापती, कृष्णा सोनवणे, नीलेश सोनवणे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते. सतीश बोरसरे, लक्ष्मण बोरसरे, मनोज प्रजापती आदींनी आधुनिक कलेचे प्रशिक्षण दिले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच खादी ग्रामोद्योगकडून मोफत यंत्र वाटप करण्यात आले. प्रास्ताविक मोहनराव जगदाळे यांनी केले. स्वागत गणेश आहेर यांनी केले. राजेंद्र सावंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर रंगनाथ सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी नवनाथ जाधव, ज्ञानेश्वर भागवत, श्यामराव जोंधळे, संजय भागवत, गुलाबराव सोनवणे, तुळशीराम मोरे, प्रा. शांतीलाल काळे आदी उपस्थित होते.
आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई यांच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाची जोड धरून पारंपरिक कुंभारकाम करणाऱ्या कारागिरांना विजेच्या चाकावर आधुनिक प्रशिक्षण देऊन त्यांच्या व्यवसाय विकासात भर पडावी यासाठी त्र्यंबक विद्यामंदिर (खादी ग्रामोद्योग विभाग) येथे दि.१३ ते २२ मे दरम्यान दहा दिवसांचे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात जिल्ह्यातील ४० कुंभार व्यावसायिक सहभागी झाले होते.