कवडीमोल दर; पिकांवर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:20 PM2020-04-15T23:20:57+5:302020-04-15T23:21:28+5:30

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन, संचारबंदी लागू केली आहे. या बरोबरच गावोगाव सीमाबंदी तर शहरात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. सर्वच भागातील आठवडे बाजार बंद झाले आहेत. परिणामी शेतात तयार झालेला शेतमाल विकावा कुठे, असा प्रश्न शेतकरीवर्गापुढे उभा ठाकला आहे. यातून स्थानिक भाजीपाला बाजारातही शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्याने, यात वाहतूक खर्चही निघत नसल्याने हताश झालेले शेतकरी आता पीक नांगरत असून, एका शेतकऱ्याने तर वांगी, कोबीच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.

Skittish rate; Anchor on crops | कवडीमोल दर; पिकांवर नांगर

वांगे, कोबी पिकावर ट्रॅक्टर फिरवताना शेतकरी.

Next
ठळक मुद्देशेतकरी हतबल : लॉकडाउनमुळे वाढल्या अडचणी

येवला : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन, संचारबंदी लागू केली आहे. या बरोबरच गावोगाव सीमाबंदी तर शहरात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. सर्वच भागातील आठवडे बाजार बंद झाले आहेत. परिणामी शेतात तयार झालेला शेतमाल विकावा कुठे, असा प्रश्न शेतकरीवर्गापुढे उभा ठाकला आहे. यातून स्थानिक भाजीपाला बाजारातही शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्याने, यात वाहतूक खर्चही निघत नसल्याने हताश झालेले शेतकरी आता पीक नांगरत असून, एका शेतकऱ्याने तर वांगी, कोबीच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.
गेल्या काही दिवसात कोरोनाच्या संकटाने हवालदिल झालेल्या तालुक्यातील अनेक द्राक्ष उत्पादकांनी आपल्या बागांवर कुºहाड चालविली होती. या पाठोपाठ काही द्राक्ष उत्पादकांनी शेतात पडून असलेली द्राक्ष खराब होण्याऐवजी रस्त्यारस्त्याने पंधरा-वीस मातीमोल दराने विक्री केली. अशीच अवस्था टरबूज उत्पादकांची झाली. त्यांनाही व्यापारी वा बाजारपेठ मिळत नसल्याने गाव-खेड्यांवर तर तसेच शहरात गल्लोगल्ली टरबूज विकावे लागत आहे. दोनच दिवसांपूर्वी जऊळके येथील टमाटे उत्पादकाने पाचशे कॅरेट टमाटे जेसीबीच्या साहाय्याने खड्डे करून दाबून टाकले. तर बुधवारी (दि.१५) आडगाव चोथवा येथील वांगे व कोबी उत्पादक शेतकरी काकासाहेब शिंदे यांनी आपल्या एक एकरातील वांगे, कोंबी पीक मातीमोल बाजारभावामुळे नांगरून टाकले आहे. सर्वच शेतकरी वर्ग कोरोनाच्या संकटाने आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे. आहे तो शेतमाल विकता येत नाही, जो काही विकला जात आहे त्यातून खर्चही सुटत नाही. अशा इकडे आड-तिकडे विहीर परिस्थितीने शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे.

खरेदीदार नसल्याने नुकसान
तालुक्यातील आडगाव चोथवा येथील शेतकरी काकासाहेब शिंदे यांनी आपल्या एक एकर शेतीत कोबी आणि वांग्याचे पीक घेतले होते. या पिकासाठी सुमारे ५० ते ६० हजार रु पये खर्च केला. ऐन विक्र ीच्या वेळीस कोरोनाचे संकट आले. कोबी आणि वांग्याला मागणी नसल्याने घाऊक खरेदीदार मातीमोल भावाने मागणी करत आहे. यातून उत्पादन खर्च तर दूर वाहतूक खर्चही निघणे दुरापास्त झाल्याने कोबी आणि वांग्यांच्या उभ्या पिकावर शिंदे यांनी ट्रॅक्टर फिरवून पीक नांगरून टाकले.

शासनाने शेतमालाची वाहतूक तातडीने सुरळीत करून, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ व चांगला बाजारभाव कसा मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
- शिवाजी वाबळे,
शेतकरी

Web Title: Skittish rate; Anchor on crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.