गंगापूररोडला भर दुपारी स्कोडा फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:31 AM2019-12-17T00:31:28+5:302019-12-17T00:32:08+5:30
जेहान सर्कल येथे उभी केलेली स्कोडा मोटारीची काच चोरट्यांनी फोडून कारमधील सुमारे ५१ हजार रुपयांच्या वस्तू लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : जेहान सर्कल येथे उभी केलेली स्कोडा मोटारीची काच चोरट्यांनी फोडून कारमधील सुमारे ५१ हजार रुपयांच्या वस्तू लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विजय गंगाराम रासकर (रा. डिसूझा कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी ऐश्वर्या रासकर ही मैत्रीण देवयानी खन्ना या दोघी रविवारी (दि.१५) दुपारी दोन वाजेच्या सुमारास जेहान सर्कलवरील रस्त्यालगत स्कोडा कार (एमएच १५, एफएन ९३९३) उभी केली. जेव्हा त्या दोघी पार्लरमधून बाहेर आल्या, तेव्हा त्यांना कारच्या एका बाजूच्या खिडकीची काच फोडलेली दिसली. त्यांनी तत्काळ कारमधील वस्तू तपासल्या असता, चोरट्याने कारमधून रोख रक्कम, जॅकेट, अॅपलचे हेडफोन असा सुमारे ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे आढळून आले.
लॅपटॉप, मोबाइल लांबविला
भारतनगर येथील एका घरातून लॅपटॉप व मोबाइल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. शाहनवाज खान यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१५) ते घराला कडी लावून अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले असता, अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून टेबलावर ठेवलेला मोबाइल व लॅपटॉप असा १५ हजार रु पयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.