इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचा स्लॅब गळका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:16 AM2021-08-26T04:16:42+5:302021-08-26T04:16:42+5:30

इगतपुरी : येथी ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. सुरुवातीस मिळणाऱ्या चांगल्या सुविधांमुळे येथील रुग्णांवर उत्तम उपचार केले ...

Slab leakage of Igatpuri Rural Hospital | इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचा स्लॅब गळका

इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचा स्लॅब गळका

Next

इगतपुरी : येथी ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. सुरुवातीस मिळणाऱ्या चांगल्या सुविधांमुळे येथील रुग्णांवर उत्तम उपचार केले जात होते. मात्र, सद्य:स्थितीतही उपचार चांगले होत असले तरी पावसाचे पाणी, भिंतीवरून ओघळणारे, लोंबकळणारे स्विच अन् वायरिंगमुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत असताना व तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना होणार असल्याचे सांगितले जात असताना ग्रामीण रुग्णालयात बालगृहातील स्लॅबच्या छताच्या पडलेल्या ढपल्यांमुळे रुग्णांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बालगृहाबरोबरच ऑपरेशन थिएटर, प्रसूतिगृह, जनरल वाॅर्ड, औषधीगृहाचीही हीच परिस्थिती आहे. प्रसूतिगृह, बालरोग, ऑर्थोपेडिक, सर्व प्रकारच्या जनरल शस्त्रक्रियांसह येथे उपचार केले जातात. सर्व उपचार नाममात्र शुल्कामध्ये होत असल्याने येथे रुग्णांची नेहमीच वर्दळ असते. दैनंदिन ओपीडीद्वारे १५० ते २०० रुग्णांवर उपचार केले जातात, तर ७० ते ८० निवासी रुग्णांवर उपचार केले जातात. यामध्ये प्रामुख्याने मध्यमवर्गीय व गरीब रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.

----------------------

रुग्णांमध्ये भीती

बालगृहातील स्लॅबच्या छताच्या ढपल्या पडल्यामुळे रुग्णांमध्ये अधिकच भीती निर्माण झाली आहे. सुदैवाने स्लॅबच्या छताच्या ढपल्या पडताना बालगृह विभागात रुग्ण नसल्याने अनर्थ टळला असला तरी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाशी रुग्णालयाने सुविधा व दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळत सुरू आहे असे येथील रुग्णांकडून बोलले जात आहे. साधा प्रस्तावही पास झाला, टेंडरही निघाले; पण सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुस्त कारभारामुळे अद्यापही काम सुरू झालेले नाही.

250821\1338-img-20210824-wa0020.jpg

इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाची स्लॅब ची झालेली दुरवस्था

Web Title: Slab leakage of Igatpuri Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.