पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला

By admin | Published: September 19, 2015 10:05 PM2015-09-19T22:05:12+5:302015-09-19T22:06:08+5:30

पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला

Slab of water tank collapses | पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला

पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला

Next

पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीतीदेवळा : देवळा नऊ गाव सामुदायिक पाणीपुरवठा योजनेतील सरस्वतीवाडी येथील पाण्याच्या टाकीचा स्लॅबचा काही भाग पुन्हा कोसळला असून, उर्वरित स्लॅबही कोसण्याच्या अवस्थेत असल्याने पाणीपुरवठा योजना धोक्यात आली आहे.
सामुदायिक पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली असून, यापूर्वीही सरस्वतीवाडी येथील टाकीचा स्लॅब फेब्रुवारी महिन्यात कोसळल्याने योजना बंद पडली होती. परंतु त्यावेळी तात्पुरती डागडुजी करून योजना पुन्हा सुरू करण्यात आली होती. पंधरा दिवसांपासून गिरणा नदीपात्रात असलेल्या विहिरींना पाणी नसल्याने शहरासह नऊ गावांचा पाणीपुरवठा बंद झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती.
गिरणा नदीपात्रात असलेल्या उद्भव विहिरींजवळच शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेली नवीन विहीर आहे. या विहिरीतील पाणी उद्भव विहिरीत टाकून नऊ गाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी नितीन शेवाळकर यांनी नगरपंचायतीचे प्रशासक तथा तहसीलदार शर्मिला भोसले यांच्याकडे केली होती. त्या प्रमाणे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय साधून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणी उद्भव विहिरीत टाकले गेले. शुक्रवारी सकाळी देवळा शहरात अर्धातास पाणीपुरवठा झाला.
दरम्यान, पाऊस सुरू झाल्याने सरस्वतीवाडी येथील पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला असून, उर्वरित स्लॅबचा भागही पावसात भिजल्याने कोसळण्याच्या स्थितीत आहे. स्लॅब कोसळून योजना बंद पडली तर पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल. देवळा शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Slab of water tank collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.