विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना चपराक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 09:35 PM2020-07-02T21:35:46+5:302020-07-02T22:58:38+5:30
लासलगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन आदेश कायम ठेवले आहेत. यामुळे पोलिसांकडून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु विनाकारण घराबाहेर फिरणारे व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर लासलगाव पोलिसांनी गुन्हे दाखल करून १९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन आदेश कायम ठेवले आहेत. यामुळे पोलिसांकडून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु विनाकारण घराबाहेर फिरणारे व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर लासलगाव पोलिसांनी गुन्हे दाखल करून
१९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिली.
निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलिसांनी आतापर्यंत ६७ गुन्हे दाखल करून तसेच दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने न्यायालयात तत्काळ दोषारोप पत्र दाखल करून सक्त कारवाई करण्याचे निर्देश नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिलेले आहे.
याच अनुषंगाने लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण घरबाहेर फिरणाऱ्यांवर करवाई करण्यात येत आहे.