बिबट्याच्या हल्यात वासरू ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:08 PM2018-04-09T14:08:09+5:302018-04-09T14:08:09+5:30
दिंडोरी- तालुक्यातील लखमापूर परिसरात बिबट्याच्या हल्याच्या घटना घडण्याचे प्रकार सरूच असल्याने मोकाट बिबट्याला पकडण्याचे आव्हान वनविभागा समोर आवासून उभे आहे.
दिंडोरी- तालुक्यातील लखमापूर परिसरात बिबट्याच्या हल्याच्या घटना घडण्याचे प्रकार सरूच असल्याने मोकाट बिबट्याला पकडण्याचे आव्हान वनविभागा समोर आवासून उभे आहे. आज पहाटे येथील माजी उपसरपंच आनंदराव मोगल यांच्या दोन वर्षाच्या वासरावर बिबट्याने केल्या हल्यात वासराचा मृत्यू झाला आहे. या वेळी वनविभागाचे अधिकारी सुनील वाडेकर यांच्या सूचनेनुसार वनरक्षक शरद मोगरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर परिसरात आढळलेल्या ठस्यांच्या अंदाजानुसार बिबट्याचे वय पाच वर्षाच्या आसपास असून याच्या सोबतीला आजून एक बछाडे असल्याचे घटना स्थालाच्या ठस्यांवरून आढळले. दरम्यान सदरच्या परिसरात आज सेन्सर कॅमेरा लावण्यात आला असून त्याच्या हालचालीवरून पुढील कार्यवाहीची दिशा ठरविली जाणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. दरम्यान परिसरात बिबट्याचे वास्तव्याच्या खुणा व नुकसान दिसत असल्याने परिसरात तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.