गंगापूर धरण परिसरात झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:59 AM2018-09-27T00:59:46+5:302018-09-27T01:00:11+5:30
गंगापूर धरणातील पाटबंधारे विभाग व पर्यटन विकास महामंडळाच्या हद्दीतील सुरू असलेल्या कामाच्या आड येणाऱ्या झाडांची सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली
गंगापूर : गंगापूर धरणातील पाटबंधारे विभाग व पर्यटन विकास महामंडळाच्या हद्दीतील सुरू असलेल्या कामाच्या आड येणाऱ्या झाडांची सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली असून, सदरची झाडे तोडण्यासाठी संबंधित ठेकेदाराने परवानगी घेतली किंवा नाही याचा उलगडा मात्र होऊ शकलेला नाही. तथापि, वृक्षप्रेमी व स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण शहर व जिल्हा गणेश विसर्जनात मग्न असताना गंगापूर धरण परिसरात सुशोभीकरणाच्या नावाखाली चांगल्या व जुन्या झाडांची सर्रासपणे कत्तल करण्यात आली. या ठिकाणी पाटबंधारे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या कामावर ठेकेदाराच्या कामगारांकडून झाडांची कत्तल करण्यात आली आहे. विशेष करून हे काम सुरू असताना त्या आड येणाºया झाडांचा अडथळा दूर कसा करणार याबाबतचा कुठलाही अभ्यास करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटन विभागाचे या ठिकाणाचे काम थांबलेले होते, ते सुरू करण्यात आल्याने त्यासाठी झाडांची कत्तल करण्यात आली. पाटबंधारे विभाग व पर्यटन विभाग पर्यावरणाचा ºहास थांबविण्यासाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे प्रबोधन करीत असताना दुसरीकडे त्यांनीच वृक्षांची कत्तल केल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.