बारा वर्षे जुन्या बदामाच्या सहा झाडांची कत्तल
By admin | Published: March 28, 2017 12:45 AM2017-03-28T00:45:49+5:302017-03-28T00:46:03+5:30
नाशिक : काठे गल्ली परिसरातील अक्षर इस्टेट परिसरातील कॉलनी रस्त्यालगत २००४ साली लावण्यात आलेल्या बदामाच्या सहा डेरेदार वृक्षांची कत्तल केल्याची बाब उघडकीस आली आहे.
नाशिक : घरात किडे, अळ्या येतात आणि फांद्यांचा त्रास होतो, अशी बिनबुडाची नानाविध कारणे दाखवून काठे गल्ली परिसरात असलेल्या अक्षर इस्टेटच्या कॉलनी रस्त्यावरील दहा ते बारा वर्षे जुनी बदामाच्या सहा झाडांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काठे गल्ली परिसरातील अक्षर इस्टेट परिसरातील कॉलनी रस्त्यालगत २००४ साली लावण्यात आलेल्या बदामाच्या सहा डेरेदार वृक्षांची कत्तल केल्याची बाब उघडकीस आली आहे. मजूर लावून या कॉलनीच्या रस्त्यावरील सहा वृक्ष थेट बुंध्यापासूनच कापून टाकण्यात आली आहेत. याबाबत येथील रहिवासी वृक्षप्रेमी अरविंद निकुंभ यांनी याबाबत दोषी लोकांवर कारवाई करण्याची मागणी महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. या तक्रार अर्जात निकुंभ यांनी ज्या नागरिकांनी आपापसांत संगनमत करून झाडे तोडण्याचा कट रचला त्या काही संशयित लोकांची नावेदेखील नमूद केली आहेत. उद्यान निरीक्षक कटारे यांनी याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. महापालिका उद्यान विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरात काही विकृ त मानसिकतेचे लोक वृक्षांवर कुऱ्हाड चालवीत असल्याचे प्रकार वारंवार निदर्शनास येत आहेत.
उद्यान विभागाला आलेली मरगळ कधी दूर होईल आणि महापालिका हद्दीत असलेल्या निसर्गाचे संवर्धनास कधी
हातभार लागेल? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.