जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या तुलनेत अल्पशी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:15 AM2021-05-12T04:15:45+5:302021-05-12T04:15:45+5:30
नाशिक- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी मंगळवारी (दि.११) सोमवारच्या तुलनेत रूग्ण संख्येत अल्पशी वाढ झाली आहे. ...
नाशिक- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी मंगळवारी (दि.११) सोमवारच्या तुलनेत रूग्ण संख्येत अल्पशी वाढ झाली आहे. सोमवारी (दि.१०) १८३५ नवे बाधित होते, मात्र मंगळवारी २ हजार १८७ नवे बाधित आढळले आहेत. अर्थात, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या मात्र वाढत आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यातील बाधितांच्या संख्येने कहर केला होता. मात्र एका उच्चांकी संख्येपर्यंत गेलेली बाधितांची संख्या मे महिन्यापासून कमी होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसात बाधितांची संख्या कमी अधिक होत असली तरी एकंदर बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. ८ मे रोजी २,७९५ बाधित आढळले होते. त्यानंतर रविवारी (दि.९) ३ हजार २ रूग्ण तर सोमवारी (दि.१०) १ हजार ८३५ इतकी कमी संख्या होती. शहरातील संख्या ९७३ इतकी कमी होती. गेल्या काही दिवसात चार आकडी संख्येपेक्षा नाशिक शहरातील बाधितांची संख्या कमी होत नव्हती. मात्र सोमवारी हजाराच्या खाली ही संख्या गेल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र मंगळवारी जिल्ह्याच्या आणि शहराच्या बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी २ हजार १८७ नवे बाधित आढळले आहेत. त्यात नाशिक शहरातील १ हजार ५८४ बाधितांचा समावेश आहे.
बाधितांची संख्या गेल्या चार दिवसात कमी जास्त होत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मंगळवारी तब्बल पाच हजाराहून अधिक बाधितांनी कोराेनावर मात केली. शनिवारी (दि.८) ४ हजार ६९, रविवारी (दि. ९) ३ हजार २५
बाधितांची संख्या गेल्या चार दिवसात कमी जास्त होत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मंगळवारी तब्बल पाच हजाराहून अधिक बाधितांनी कोराेनावर मात केली. शनिवारी (दि.८) ४ हजार ६९, रविवारी (दि. ९) ३ हजार २५ सोमवारी (दि. १०) २ हजार ८३३ तर मंगळवारी (दि.११) उच्चांकी ५ हजार ३८५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण देखील सध्या कमी होत असून मंगळवारी ३८ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची एकूण संख्या ३ हजार ९३ झाली आहे.
इन्फो...
आजपासून जिल्ह्यात कडक निर्बंध
राज्य शासनाने कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन ५ एप्रिल पासूनच कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यात आता १२ ते २३ मे असे एकूण बारा दिवस जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील नागरिक वगळता अन्य नागरिकांना केवळ वैद्यकीय कारणासाठीच बाहेेर पडता येणार आहे. उद्योग तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. या कडक निर्बंधामुळे बाधितांची संख्या आणखी वेगाने कमी होण्यास मदत होईल, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.